बेपत्ता महिलांचा शोध घेत होते, तपासात जे समोर आले ते पाहून पोलिसही चक्रावले
रोसेलिन आणि पद्मा या दोन महिला बेपत्ता होत्या. एक जूनपासून तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती. या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
केरळ : साक्षरतेमध्ये भारतात पहिल्या क्रमांकावर असलेल्या केरळमध्ये अंधश्रद्धेचे (Superstition in Kerala) एक भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. धन आणि संपत्तीसाठी एका जोडप्याने दोन महिलांचा नरबळी (Human Sacrifice) दिल्याची घटना केरळमधील तिरुवल्ला (Tiruvalla Kerala) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीसह तिघांना अटक (Three Accused Arrested) केली आहे. भगावल सिंह, लीला भगावल सिंह आणि शिहाब अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रोसेलिन आणि पद्मा या दोन महिला बेपत्ता होत्या. एक जूनपासून तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती. या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
आरोपींकडून गुन्ह्याची कबुली
हे धागेदोरे जोडत पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. आरोपींची अधिक चौकशी सुरु आहे. या हत्याकांडात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याबाबतही पोलिसही तपास करत आहेत.
एर्नाकुलम येथून महिलांचे अपहरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांचे एर्नाकुलमहून अपहरण करण्यात आले होते. शिहाबने या दोन महिलांना फूस लावून अपहरण करुन आणल्याचा कथित आरोप आहे. दोघींची हत्या तिरुवल्ला येथे करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह शेतात पुरण्यात आले होते.
धन, संपत्ती प्राप्तीसाठी हत्या केल्याचा संशय
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले. सिंह दाम्पत्य सध्या आर्थिक संकटात होते. यातूनच देवाला खूश करण्यासाठी आणि संपत्ती, धन प्राप्तीसाठी त्यांनी महिलांचा नरबळी दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.