सांगलीनंतर कोल्हापुरात फिल्मी स्टाईलने धाडसी दरोडा, ज्वेलर्सची दुकाने चोरट्यांच्या निशाण्यावर

सांगलीनंतर कोल्हापुरात सशस्ज्ञ दरोड्याचा थरार पहायला मिळाला आहे. थरारक घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सांगलीनंतर कोल्हापुरात फिल्मी स्टाईलने धाडसी दरोडा, ज्वेलर्सची दुकाने चोरट्यांच्या निशाण्यावर
कोल्हापुरमध्ये भरदिवसा दरोडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 2:59 PM

कोल्हापूर : सांगलीतील दरोड्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्ये दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरमधील बालिंगा येथे कात्यायनी ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा पडल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी दिवसाढवळ्या हातात बंदुक घेऊन दरोडेखोर दुकानात घुसले. मग बंदुकीच्या धाकावर तब्बल एक कोटी 85 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची प्राथमिक माहिती मिळते. दुकानदाराने विरोध केल्याने दरोडेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दुकानदार आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. दरोडा सुरु असताना बाहेर जमाव जमला होता. या जमावावर सुद्धा दरोडेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

शंकर माळी असे मालकाचे, तर जितू माळी असे जखमी सहकाऱ्याचं नाव आहे. गोळीबारात रमेश यांच्या हाताला गंभीर इजा झाली असून, जितू यांच्या कंबरेजवळ गोळी आरपार झाली. दोघांवरही कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भरदुपारी घडली लुटीची घटना

कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा येथे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरुन आलेले दोघे दरोडेखोर दुकानात घुसले. त्यांनी बंदुकीच्या धाकावर दुकान लुटण्यास सुरवात केली. मात्र दुकानमालक आणि त्याच्या सहकाऱ्याने दरोडेखोरांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. पूर्ण ताकदीनिशी दोघांनी आरोपींशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला.

हे सुद्धा वाचा

घटना सीसीटीव्हीत कैद

दरोड्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर लुटलेला मुद्देमाल घेऊन आरोपी पळून जात असताना काही तरुणांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी तरुणांच्या दिशेने गोळीबार केल्याने तरुणांचा नाईलाज झाला. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.