kolhapur Molestation : शिक्षकी पेशाला काळिमा, पॉर्न फिल्म दाखवून शालेय विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य
दोन वर्षापासून बांगडी हा आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना पॉर्न व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत लज्जास्पद कृत्य करायचा. याबाबत गावातील नारिकांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शाळा व्यवस्थापनेकडे धाव घेत या प्रकाराची माहिती दिली.
कोल्हापूर : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यालंकार शेळेवाडी शाळेत नववी आणि दहावीच्या मुलींना शिक्षकानेच पॉर्न व्हिडीओ दाखविल्याची घटना उघडकीस आली आहे. पॉर्न व्हिडिओ दाखवून नराधम शिक्षक मुलींना नको तिथे स्पर्श करुन त्यांचा विनयभंग करत होता. व्ही. पी. बांगडी असे सदर शिक्षकाचे नाव असन तो नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवतो. संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनींनी केली आहे. मात्र संबंधित शिक्षकाची सातारा जिल्ह्यात बदली करुन संस्थेकडून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षापासून सुरु होता गैरप्रकार
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यालंकार शेळेवाडी शाळेत हा घृणास्पद प्रकार घडला आहे. इंग्रजी विषयाचा शिक्षक व्ही. पी. बांगडी हा गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य करत होता. आतापर्यंत त्याने अनेक विद्यार्थिनींना आपल्या जाळ्यात ओढत गैरकृत्य केले.
पॉर्न व्हिडिओ दाखवून लज्जास्पद कृत्य करायचा
दोन वर्षापासून बांगडी हा आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना पॉर्न व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत लज्जास्पद कृत्य करायचा. याबाबत गावातील नारिकांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शाळा व्यवस्थापनेकडे धाव घेत या प्रकाराची माहिती दिली.
शिक्षकाची सातारा येथे बदली
शाळा व्यवस्थापनेने शिक्षकाची तात्काळ सातारा येते बदली केली. शिक्षकाच्या या कृ्त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.