सर्व कुटुंबीय रात्री घरात जेवत होते, अचानक जे घडलं त्यानंतर सेंट्रिंग कामगाराचा…; काय घडलं नेमकं?

रात्री सर्व कुटुंबीय जेवायला बसले होते. यादरम्यान शेजारी अचानक घरी आला. यानंतर जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

सर्व कुटुंबीय रात्री घरात जेवत होते, अचानक जे घडलं त्यानंतर सेंट्रिंग कामगाराचा...; काय घडलं नेमकं?
करणीच्या संशयातून शेजाऱ्याने शेजाऱ्याला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 5:27 PM

भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर : करणीच्या संशयातून शेजाऱ्याची घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूरच्या टेंबलाई उड्डाणपूलाजवळील झोपडपट्टीत ही घटना घडली. या हल्ल्यात शेजाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर बचावासाठी आलेल्या सुनेवरही जीवघेणा हल्ला केल्याने सून जखमी झाली आहे. आझाद मुलतानी असे मयत व्यक्तीचे नाव आहे, तर अफसाना आसिफ मुलतानी असे जखमी सुनेचं नाव आहे. घटनेनंतर हल्लेखोर निखिल गवळी स्वतःहून पोलिसात हजर झाला.

करणीच्या संशयातून शेजाऱ्यावर हल्ला

आझाद मुल्तानी आपल्यवर करणी करत असल्याचा निखिल गवळी याला संशय होता. याच संशयातून काल रात्री साडे आठच्या सुमारास निखिल मुलतानी यांच्या घरात घुसला. यावेळी मुलतानी कुटुंबीय जेवत होते. मुलतानी यांचे दोन खोल्यांचे घर आहे. बाहेरच्या खोलीत मुलतानी, त्यांनी पत्नी, मुलगा, दोन सुना जेवत होते. यावेळी निखिलने त्यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. सासऱ्यावरील हल्ला रोखण्यासाठी सून अफसाना मध्ये पडली असता आरोपीने तिच्यावरही हल्ला केला.

हल्ल्यात सासऱ्याचा जागीच मृत्यू, सून गंभीर जखमी

या हल्ल्यात मुलतानी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सून जखमी झाली. सुनेला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेनंतर आरोपी स्वतः राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

हे सुद्धा वाचा

निखिलचे वागणे चांगले नसल्याचे शेजाऱ्यांनी पोलीस चौकशीत सांगितले. यामुळे त्याला येताना पाहिले की सर्वजण आपला दरवाजा बंद करत असत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.