असे काय घडले की सुखी संसाराचा कालव्यात अंत झाला, पती आणि मुलांना कालव्यात ढकलले मग…

संदीप शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरुन घरुन निघाला. कसबा सांगाव येथील दूधगंगा डाव्या कालव्याजवळ येताच त्याने पत्नी आणि दोन मुलांना कालव्यात ढकलले.

असे काय घडले की सुखी संसाराचा कालव्यात अंत झाला, पती आणि मुलांना कालव्यात ढकलले मग...
तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडाला अटकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 9:56 AM

कोल्हापूर /भूषण पाटील : कौटुंबिक कलहातून पत्नीसह मुलांना कालव्यात ढकलून स्वतःही जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली आहे. कागलमधील कसबा सांगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत सुदैवाने 13 वर्षाची मुलगी बचावली आहे. मयत कुटुंबीय करवीर तालुक्यातील हलसवडे गावचे रहिवासी आहेत. संदीप पाटील, राजश्री पाटील आणि सन्मित पाटील अशी मयतांची नावे आहेत. संदीप पाटील यांनी कुटुंबाला कालव्यात ढकलून देत स्वतःही जीवन संपवले.

पाहुण्यांकडे जाण्यासाठी घरुन कुटुंबासह निघाला पण…

संदीप पाटील हे साऊंड सिस्टीमच्या व्यवसायासोबत शेतीही करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. संदीप शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरुन घरुन निघाला. कसबा सांगाव येथील दूधगंगा डाव्या कालव्याजवळ येताच त्याने पत्नी आणि दोन मुलांना कालव्यात ढकलले. यानंतर स्वतः निपाणी तालुक्यातील भोज येथे जाऊन जीवन संपवले.

सुदैवाने मुलगी बचावली

यात सुदैवाने बचावलेली मुलगी दुपारच्या सुमारास कालव्याच्या कठड्यावर रडत मदतीची याचना करत असल्याचे काही लोकांनी पाहिले. नागरिकांनी तिला बाहेर काढले. यानंतर कागल पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलीने दिलेल्या माहितीनुसार कागल पोलिसांनी मृतदेहांचा शोध घेतला असता कालव्यात आई आणि मुलाचे मृतदेह सापडले. यानंतर संदीपचा शोध घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

मुलीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु

शोध घेत असतानाच संदीपने भोज येथे आत्महत्या केल्याचे कळले. या घटनेत बचावलेल्या मुलीच्या डोक्याला मार लागला आहे. तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कागल पोलिसात हत्या आणि आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, संदीपने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले हे अद्याप कळू शकले नाही. कागल पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.