बाप-बेट्याचं जमेना, संतप्त पित्याने ‘अशी’ घडवली अद्दल

पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर सविताने दीरासोबतच दुसरे लग्न केले होते. विवेकानंद मंडल उर्फ सपू मंडल असे या आरोपीचे नाव आहे. सविताला पहिल्या पतीपासून वीस वर्षांचा मुलगा होता.

बाप-बेट्याचं जमेना, संतप्त पित्याने 'अशी' घडवली अद्दल
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 2:34 PM

लुधियाना : रक्ताच्या नात्याला अलीकडच्या काळात रक्तरंजित स्वरूप लाभले आहे. अनेकदा नात्यातील लोक एकमेकांवर मालमत्ता किंवा अन्य कुठल्या कारणांवरून तुटून पडतात. यातून हत्यासारख्या गंभीर घटना घडत आहे. पंजाबच्या लुधियाना परिसरात देखील अशाच प्रकारे एका पित्याने त्याच्या मुलाची निर्घृण हत्या केली. ही घटना इतकी भयंकर आहे की मुलाची हत्या केल्यानंतर क्रूर सावत्र पित्याने त्या मुलाचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकला आणि सभोवती सिमेंटने प्लास्टर केले. या घटनेचे वृत्त ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहत आहे.

परिसरात दुर्गंधी येताच मुलाच्या आईने हत्यागंडाचा केला उलगडा

क्रूर सावत्र पित्याने मुलाला जीवे मारून ड्रममध्ये भरले. आपल्या कृत्याचा कुणाला थांगपत्ता लागू नये म्हणून आरोपीने खबरदारी घेतली होती. पण काही दिवसांनंतर मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागली.

यादरम्यान मुलगा बेपत्ता असल्याने मुलाच्या आईला संशय आला. तिने लगेच शोधाशोध सुरू केले. तिला ड्रमभोवती केलेले प्लास्टर संशयास्पद वाटले. या संशयावरून तिने पोलिसांना माहिती दिली आणि त्यातून धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला.

हे सुद्धा वाचा

सावत्र पित्यानेच मुलाची हत्या केली हे कळताच सर्वजण हादरले आहेत. हत्याकांडानंतर आरोपी फरार झाला असून, स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुलाचे हातपाय बांधून मृतदेह ड्रममध्ये पॅक केला!

आरोपीच्या क्रूर कृत्याचा कहर पाहायला मिळाला आहे. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याचे हातपाय बांधले आणि त्याला ड्रममध्ये पॅक केले. मुलाच्या आईने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर सविताने दीरासोबतच दुसरे लग्न केले होते. विवेकानंद मंडल उर्फ सपू मंडल असे या आरोपीचे नाव आहे. सविताला पहिल्या पतीपासून वीस वर्षांचा मुलगा होता. याच वीस वर्षीय पियुषची आरोपी विवेकानंदने हत्या केली.

आरोपी पित्याचे मुलाशी व्हायचे वारंवार भांडण

आरोपी विवेकानंद याचे मुलगा पियुषसोबत वारंवार भांडण व्हायचे. पियुषला विवेकानंदचे वागणे पसंत नव्हते. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींवरून दोघांमध्ये नेहमीचा वाद व्हायचा.

मुलाच्या या सततच्या कटकटीला कंटाळून विवेकानंदने मुलाला कायमचा संपवण्याचा प्लान आखला. त्यातूनच त्याने हत्येची संपूर्ण तयारी केली. पूर्ण नियोजन करून त्याने हा कट रचला होता. त्यामुळे त्याच्या कृत्याचा सुरुवातीला काही तास कुणालाही मागमूस लागला नव्हता.

पण विवेकानंदच्या पत्नीने या कृत्याचा पर्दाफाश केलाच. काही दिवस मुलगा बेपत्ता होता. याबद्दल सविता विवेकानंदकडे चौकशी करायची. मात्र प्रत्येक वेळी तो उत्तर देण्यास टाळाटाळ करायचा. पोलीस सध्या फरार विवेकानंदचा शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक करू, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.