वडिलांना सांगितलं मी तुमच्या सुनेला…, मग सुनेचा शोध घेतला असता बापाच्या पायाखालची जमीनच सरकली !

पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर पतीने जे केले त्यानंतर दोन मुलं आईच्या प्रेमाला पोरकी झाली.

वडिलांना सांगितलं मी तुमच्या सुनेला..., मग सुनेचा शोध घेतला असता बापाच्या पायाखालची जमीनच सरकली !
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 5:26 PM

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाला. वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. यानंतर आरोपी पतीने आपल्या पित्याला सांगितले की, मी तुमच्या सुनेची हत्या केली आहे, शक्य असेल तर शोधून काढा. मुलाच्या तोंडून ही बाब ऐकताच पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काही वेळाने सकाळपासून सून घरात कुठेच दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने वृद्ध वडील घाबरले. घरातील सदस्यांनाही धक्का बसला. सर्वजण सुनेचा शोध सुरू घेऊ लागले. पण ती कुठेच दिसत नव्हती. खूप शोध घेतला असता जे समोर आले ते हृदय पिळवटून टाकणारे होते. पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता.

पती-पत्नीमध्ये 7 वर्षापासून सुरु होता वाद

पती-पत्नीमधील घरगुती वादातून उज्जैन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. नरवल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालखंडा परिसरात एका महिलेचा मृतदेह बेडमध्ये आढळून आला आहे. दीपा असे या महिलेचे नाव आहे. महिलेच्या पतीने तिची हत्या केली आहे. विजय परमार असे आरोपी पतीचे नाव असून, तो व्यवसायाने शिंपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा आणि विजय यांच्यात गेल्या 7 वर्षांपासून वाद सुरू होता. गेल्या वर्षी दोघांमध्ये करारही झाला होता. या दोघांना दोन मुले आहेत. एक 17 वर्षांचा मुलगा असून, तो आईसोबत राहतो आणि एक 21 वर्षांची मुलगी असून, ती मामाकडे राहते.

अल्पवयीन मुलाने सांगितला आईच्या हत्येचा थरार

प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीच्या अल्पवयीन मुलाने पित्याच्या कृत्याचे रहस्य उघडले. अल्पवयीन मुलाने पोलिसांना सर्व घटना सांगितली. वडिलांनी रात्री आजोबांना सांगितले की, मी तुमच्या सुनेची हत्या केली आहे. यानंतर कुटुंबीयांनी महिलेचा शोध सुरू केला, मात्र ती कुठेच दिसली नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर बेडमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.