Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम प्रकरणातून तरुणावर जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी तरुणाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज

प्रेमप्रकरणातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नागपुरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

प्रेम प्रकरणातून तरुणावर जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी तरुणाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज
प्रेम प्रकरणातून तरुणावर जीवघेणा हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 3:44 PM

नागपूर / सुनील ढगे : प्रेम करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना नागपुरमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. नागपुरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दतीतील वनदेवी नगर परिसरातील झोपडपट्टीत ही घटना घडली.

नात्यातील तरुणासोबत होते प्रेमसंबंध

पीडित तरुणाचे नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी अनेक वेळी तरुणीपासून लांब राहण्याची धमकी तरुणाला दिली होती. मात्र दोघेही ऐकायला तयार नव्हते. यामुळे संतापलेल्या आरोपींनी भरदिवसा वस्तीत घुसून तरुणावर चाकूने हल्ला केला.

तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु

यशोधरा नगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर प्रकरणाचा तपास सुरु करत दोन आरोपींना अटक केली. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

चंद्रपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला

तरुणीला लग्नाला नकार देत असल्याने रागाच्या भरात तरुणाने भररस्त्यात तिच्या डोक्यात हातोडा घालून तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव बचावला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केले आहे. तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र तरुणीला हे प्रेम मान्य नव्हते.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज.
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी.
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?.