नागपूर / सुनील ढगे : प्रेम करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना नागपुरमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. नागपुरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दतीतील वनदेवी नगर परिसरातील झोपडपट्टीत ही घटना घडली.
पीडित तरुणाचे नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी अनेक वेळी तरुणीपासून लांब राहण्याची धमकी तरुणाला दिली होती. मात्र दोघेही ऐकायला तयार नव्हते. यामुळे संतापलेल्या आरोपींनी भरदिवसा वस्तीत घुसून तरुणावर चाकूने हल्ला केला.
यशोधरा नगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर प्रकरणाचा तपास सुरु करत दोन आरोपींना अटक केली. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
तरुणीला लग्नाला नकार देत असल्याने रागाच्या भरात तरुणाने भररस्त्यात तिच्या डोक्यात हातोडा घालून तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव बचावला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केले आहे. तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र तरुणीला हे प्रेम मान्य नव्हते.