नागपूर : उपराजधानीतही हत्यासत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. किरकोळ कारणातून जीव घेण्याच्या घटना वाढत आहेत. आज पुन्हा एकदा घटनेने नागपूर हादरलं आहे. मैत्रिणीशी बोलल्याच्या कारणातून एका 21 तरुणाची हत्या केल्याची घटना नागपुरातील जरीपटका परिसरात घडली. श्रेयांश शैलेश पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. या हत्याकांडात चार ते पाच आरोपींचा समावेश असून, हत्या केल्यानंतर सर्वजण फरार झाले आहेत. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा घेत शोध आहेत.
जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रावस्ती नगरातील बौद्ध विहारजवळ 21 वर्षीय श्रेयांश पाटील याच्यावर चार ते अज्ञात मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला. लाथा बुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्राने वार केला. गंभीर जखमी झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन श्रेयांशचा मृत्यू झाला. श्रेयस हा एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्यामुळे त्याच्या खून करण्यामागे नेमकं काय उद्देश याचा शोध सध्या जरीपटका पोलीस घेत आहे. तसेच पोलीस मारेकऱ्यांचाही शोध घेत आहे.
मुख्य आरोपीच्या मैत्रिणीसोबत बोलल्याने श्रेयांशची हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र पोलिसी तपासात सत्य समोर येईल. प्राथमिक तपासात पोलिसांना मारेकऱ्यांचे घटनास्थळातील परिसरातून जाताना पाठमोरे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. या हत्येमागे श्रेयांशचा कुणासोबत काही वाद होता का? याचीही चौकसी पोलीस करत आहेत. सीसीटीव्हीत खून करणारे हे युवक असल्याचं दिसून, त्यांचा मागावर शोध पथक रवाना झाले आहे.