Crime : दहीहंडीवेळी गर्दीचा फायदा घेत त्याने… नागपूरमधील धक्कादायक घटनेने खळबळ

राज्यभरात दहिहंडीचा सण मोठ्या उत्साहाने पार पडला. मानाच्या दहिहंड्या गोविंदा पथकांनी मानवी मनोरे उभे करत फोडल्या. या दहिहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. मात्र या गर्दीता फायदा घेत एकाने तरूणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

Crime : दहीहंडीवेळी गर्दीचा फायदा घेत त्याने... नागपूरमधील धक्कादायक घटनेने खळबळ
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 7:11 PM

राज्यभरात दहिहंडिचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. गोविंदा पथकांनी बहादुरी दाखवत थर लावत मोठया मानाच्या हंड्या फोडल्या. या दहिहंडी पाहण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी तरूणाईने मोठी गर्दी केलेली पाहायला मिळालेली. दहिहंडीच्या मंचावर आयोजकांनी नृत्यंंगणा बोलावल्या होत्या. त्यांचा डान्स पाहण्यासाठीसुद्धा अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. मात्र नागपूरमध्ये या गर्दीचा फायदा घेत एकाने तरूणीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाहीतर त्याला पकडण्यासाठी पोलीस गेल्यावर त्याने पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडला.

अंकुश उर्फ गुड्डू बागडी (37) तसेच वडील पिंटू बागडी (वय 73) यांच्यावर गुन्हा दाखल करत मुलगा अकुंशला अटक करण्यात आली आहे. इतवारी परिसरात दहीहंडी कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेतो अंकुश हा तरुणीची छेड काढत असल्याची तक्रार तहसील पोलिसात एका तरुणीने केली. त्या आधारे पोलिसांनी अंकुशच्या घरी कारवाई साठी गेले. यावेळी अंकुश पाळीव कुत्र्याला घेऊन तो घराबाहेर आला. याच वेळी अकुंशचे वडील पिंटु बागडी हे सुद्धा बाहेर आलेय. यावेळी फिर्यादी पोलीस कर्मचारी संजय साहूने अकुंशला पोलीस स्टेशनला चल म्हटल्यावर त्याने पोलिसांसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर कुत्र्याला पोलीस कर्मचाऱ्यांचा अंगावर सोडले.

कुत्र्याने संजय साहू नामक पोलिसाचा हाताला चावा घेतल्याने ते जखमी झाले. संजयने पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची नोंद केली. त्यानंतर आणखी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत नेऊन अंकुश बागडीला अटक केली. अंकुश बागडी यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची पार्श्वभूमी तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी सांगितलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.