Nagpur Crime : नागपूरमध्ये जन्मदात्या पित्यानेच पैशासाठी नवजात बालिकेला विकले, दोन आरोपींना अटक

नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील राणी दुर्गवती चौकात भंडारा जिल्ह्यातून कामाच्या शोधत आलेलं एक दाम्पत्य राहत होतं. दोघेही मोलमजुरीची काम करत होते. पती उत्कर्ष हा दारुडा होता. या दाम्पत्याला नुकतीच मुलगी झाली आहे. याचदरम्यान उत्कर्षच्या संपर्कात उषा सहारे नावाची महिला आली आणि तिने त्याला पैसे मिळवून देण्याच आमिष दाखवले.

Nagpur Crime : नागपूरमध्ये जन्मदात्या पित्यानेच पैशासाठी नवजात बालिकेला विकले, दोन आरोपींना अटक
नागपूरमध्ये जन्मदात्या पित्यानेच पैशासाठी नवजात बालिकेला विकलेImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 9:23 PM

नागपूर : नागपुरात एका नवजात बाळाला पित्या (Father)नेच विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी 2 आरोपींना अटक (Arrest) केली आहे. उत्कर्ष दहिवले असे नराधम पित्याचे तर उषा सहारे असे मध्यस्थ महिलेचे नाव आहे. उत्कर्ष दहिवले याला दारुचे व्यसन आहे. यातूनच पैशाच्या हव्यासापोटी त्याने पोटच्या नवजात मुलीला विकल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. मध्यस्थ महिला एका अनाथ आश्रमात काम करत असून ती हे बाळ एका दाम्पत्याला विकणार होती. दरम्यान बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याचीही पोलिस चौकशी करत आहेत. (In Nagpur the father sold the newborn girl to a agent for money)

बाळाच्या बदल्यात पित्याला 70 हजार रुपये देण्याचे ठरले

नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील राणी दुर्गवती चौकात भंडारा जिल्ह्यातून कामाच्या शोधत आलेलं एक दाम्पत्य राहत होतं. दोघेही मोलमजुरीची काम करत होते. पती उत्कर्ष हा दारुडा होता. या दाम्पत्याला नुकतीच मुलगी झाली आहे. याचदरम्यान उत्कर्षच्या संपर्कात उषा सहारे नावाची महिला आली आणि तिने त्याला पैसे मिळवून देण्याच आमिष दाखवले. ही महिला खाजगी अनाथ आश्रमात काम करते. तिने उमरेडमधील एका गरजू दाम्पत्याला पकडले. त्यांना नेमकं तिने काय सांगितलं हे स्पष्ट नाही. मात्र उत्कर्ष याला 70 हजार रुपये देण्याचं ठरलं आणि त्याने आपल्या नवजात बाळाला विकलं. मात्र बाळाच्या आईला याची माहिती मिळताच तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.

बापाला घेणाऱ्या दाम्पत्याचीही पोलिसांकडून चौकशी

पोलिसांनी बाळाच्या पित्याला आणि दलाल महिलेला याप्रकरणी अटक केली असून आता यात घेणाऱ्याची भूमिका काय होती याचा तपास पोलीस करत आहेत. मध्यस्थी करणाऱ्या महिलेने बाळ घेणाऱ्या दाम्पत्याला काही वेगळीच माहिती दिली असावी, असा अंदाज आहे. त्यांना बाळ नसल्याने त्यांनी या महिलेच्या बोलण्यात येऊन पैसे दिले तर त्या बाळाचा बाप मात्र दारुडा असल्याने त्याने हे कृत्य पैश्यासाठी केलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (In Nagpur the father sold the newborn girl to a agent for money)

इतर बातम्या

Mumbai Crime : मुंबईच्या रस्त्यावर खतरनाक थरार, पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या

Dombivali : डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार, शाळेची फी थकवल्याने एका विद्यार्थ्याला वेगळ्या वर्गात तीन तास एकटेच बसवले

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.