गाड्यांची तोडफोड, दारुच्या बाटल्या फोडल्या, बारमध्ये टोळक्याचा धुडगूस; उपराजधानीत चाललंय काय?

दोन दिवसापूर्वी झालेला वाद विकोपाला गेला. या वादातून टोळक्याने धुडगूस घालत बारमध्ये धिंगाणा केला. या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गाड्यांची तोडफोड, दारुच्या बाटल्या फोडल्या, बारमध्ये टोळक्याचा धुडगूस; उपराजधानीत चाललंय काय?
जुन्या वादातून बारमध्ये तोडफोडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 2:13 PM

नागपूर / सुनील ढगे : जुन्या वादातून बारमध्ये तोडफोड करत टोळक्याने मॅनेजरवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये उघडकीस आली आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील संग्राम बारमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून, अन्य फरार आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टोळक्याकडून बारमध्ये तोडफोड करत मॅनेजरवर हल्ला

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील संग्राम बार सुरू असताना त्या ठिकाणी 10 ते 12 जणांची टोळी आली. त्यांनी आधी बाहेर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. मग बारमध्ये घुसत मॅनेजरवर हल्ला केला. त्या ठिकाणी असलेल्या दारूच्या बॉटल्स, टीव्ही फोडला आणि धुडगूस घालत काउंटरमधील पैसे सुद्धा घेऊन पळाले.

दारु पिण्याच्या वादातून घडली घटना

ही सगळी घटना दोन दिवसांपूर्वी झालेल्या दारू पिण्याच्या वादातून घडली. दोन दिवसांपूर्वी आरोपीतील काही लोकांनी याच बारमध्ये दारू पाण्यावरून वाद घातला होता. त्या वादाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. बारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जाऊन टोळक्याने हल्ला केल्याच्या घटनेने नागपुरात गॅंगवॉरची स्थिती निर्माण झाली का असे प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.