मोठा भाऊ शिव्या द्यायचा म्हणून लहान भावाला संपवलं! आधारतीर्थ आश्रमातील खून प्रकरणात आणखी काय समोर आलं?
नाशिकच्या ग्रामीण पोलीसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करत असतांना समुपदेशन करत या गुन्ह्याची उकल केली असून या घटणेने शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
नाशिक : नाशिकच्या आधारतीर्थ आश्रमात चार वर्षीय बालकाचा मृत्यूचे कारण समोर आले आहे. संशयित 13 वर्षीय मुलानं दिलेल्या कबुलीत जबाबात दिलेल्या माहितीवरुन क्षुल्लक कारण समोर आले आहे. चार वर्षीय मयत अलोकचा अकरा वर्षीऊ भाऊ आयुष तेरा वर्षीय आरोपीला शिवीगाळ करायचा, आठवडाभरा पूर्वी त्यांचे भांडण झाले होते आणि त्याचा राग मनात धरला होता. ही बाब पोलीस तपासात समोर आल्याने आधारतीर्थ आश्रमासह ग्रामीण पोलीसही चक्रावून गेले आहे. मंगळवारी आधारतीर्थ आश्रमात सकाळी सहा वाजेच्या दरम्यान चार वर्षीय अलोक शिंगारे याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा गळा आवळून मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत असतांना संशयित एका 13 वर्षीय मुलाला ग्रामीण पोलीसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्यामध्ये त्याने खुनाची कबुली दिली आहे.
यामध्ये चार वर्षीय मयत अलोकचा अकरा वर्षीऊ भाऊ आयुष तेरा वर्षीय आरोपीला शिवीगाळ करायचा, आठवडाभरा पूर्वी त्यांचे भांडण झाले होते आणि त्याचा राग मनात धरूनत्याने अलोकचा खून केल्याची कबुली दिली आहे.
नाशिकच्या ग्रामीण पोलीसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करत असतांना समुपदेशन करत या गुन्ह्याची उकल केली असून या घटणेने शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
नाशिक ते त्र्यंबकेश्वर रोडवरील अंजनेरी शिवारातील आधारतीर्थ आश्रम हे संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे. यामध्ये अनेक नेट, अभिनेते या आश्रमाला येऊन दान करत असतात.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांसाठी आणि गोर-गरीबांच्या मुलांसाठी आधारतीर्थ आश्रम म्हणून परिचित आहे त्यामुळे येथील खुनाची घटना चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे, त्यानंतर या आधारतीर्थ आश्रमावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
एकूणच अल्पवयीन मुलांच्या मनात आलेल्या रागातून घडलेले हे कृत्य चिंतेची बाब असून या आश्रमातील मुलांचं समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.