पोलिसांची चुक दाखवत नेटकऱ्यांनी ठेवलं नियमांवर बोट, पोलिसांनी अशी कोणती चुक केली?
पोलीसांच्या एका चुकीचे फोटो व्हिडिओ काढून काही सवाल उपस्थित करत मालेगावकरांनी पोलिसच नियम पाळत नसल्याचे समोर आणून कारवाईची मागणी केली आहे.

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव ( नाशिक ) : सर्वसामान्य नागरिकांकडून वाहतुक नियमांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. नियमांवर बोट ठेऊन हजारो रुपयांचा दंड ठोठावला जातो. त्यामुळे नागरीकांकडून अनेकदा संताप व्यक्त केला जातो. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत असल्याने पोलीसांच्या बद्दल नागरिकांच्या मनात नाराजी असते. त्यामुळे पोलीस चुकले कि नागरिक त्यांच्यावर बोलण्याची किंवा मत मांडण्याची एकही संधी सोडत नाही. असाच प्रकार मालेगाव शहरात सध्या सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. मालेगावकरांनी पोलिसांची चुक निदर्शनास आणून देत कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.
मालेगाव पोलीसांची एक चुक दाखवत नेटकऱ्यांनी पोलिसांनाच नियम विचारण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य जनतेला जो नियम आहे तो तुम्हाला नाही का? असा सवाल विचारला जात आहे.
मालेगाव शहर पोलिसांच्या एका चारचाकी वाहनाचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये मालेगाव शहर पोलिसांची एमएच 12 टिडी 7886 क्रमांकाच्या गाडीच्या काचा पूर्ण काळ्या केल्या आहे.




पोलिसांचीच हीच चुक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फोटो आणि व्हिडिओ काढून पोलीसांच्या बाबतीत सवाल उपस्थित केले आहे.
नियमांवर बोट ठेऊन नागरिकांना हजारो रुपयांचा दंड ठोठावनारे पोलीसच गुन्हा करतात मग त्यांच्यावर आरटीओ विभाग कारवाई करणार का ? असा विचारणा नेटकरी करू लागले आहे.
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी फक्त नगरिकांचीच आहे का? पोलिसांची नाही का ? असा सवालही नागरिक विचारू लागले आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे.
नियमांचे धडे देणारेच नियम पायदळी तुडवत असतील तर आता आरटीओ विभागही गप्प का ? असा सवाल उपस्थित करून पोलीसांच्या चुकीवरच नागरिकांनी सोशल मीडियावर मत मांडण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे मालेगाव शहर पोलिसांवर आरटीओ विभाग किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करणार का? याकडे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.