मावस सासऱ्यानेच सुनेचं कुंकू पुसलं…पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बाब

मयत आणि संशयित आरोपी यांच्यात चांगले संबंध होते, दरम्यान संशयित आरोपी कोरडे हे शेतमाल विक्रीसाठी नाशिकला आले होते.

मावस सासऱ्यानेच सुनेचं कुंकू पुसलं...पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बाब
सहा दूध उत्पादकांना अटकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 10:13 PM

नाशिक : नाशिकच्या पंचवटीतील मेरी वसाहतीत झालेल्या एका हत्येने खळबळ उडाली आहे. दिवाळीला माहेरी गेलेल्या पत्नीला पती बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. लागलीच पत्नीने याबाबत पती संतू वायकुंडे यांना खाजगी दवाखान्यात नेले होते. मात्र त्यांनी जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. त्यात संतू वायकंडे यांचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला होता. त्यात संतू वायकंडे यांचा कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची बाब समोर आली होती. मयत संतू वायकंडे यांच्या पत्नी लता वायकंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पंचवटी पोलीसांनी अवघ्या बारा तासात गुन्ह्याची उकल केली आहे. मयत संतू वायकंडे यांचा खून त्यांच्याच मावस काकाने केल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपीचे नाव निवृत्ती हरी कोरडे असे असून त्याला पोलीसांनी राहत्या घरातून अटक केली आहे.

मयत असलेले संतू वायकंडे यांना संशयित आरोपी निवृत्ती हरी कोरडे यांनी काही महिन्यांपूर्वी उसने पैसे दिले होते.

मयत आणि संशयित आरोपी यांच्यात चांगले संबंध होते, दरम्यान संशयित आरोपी कोरडे हे शेतमाल विक्रीसाठी नाशिकला आले होते.

रात्री उशीर झाल्याने त्यांनी मेरी परिसरात राहणाऱ्या संतू वायकंडे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेत मुक्काम केला होता.

याच दरम्यान मयत संतू आणि संशयित आरोपी निवृत्ती यांनी दारू पार्टी करत जेवण केले, याचवेळी निवृत्ती यांनी उसने पैसे मागितल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

त्यातच निवृत्ती कोरडे यांनी दारूच्या नशेत पहाटेच्या वेळी संतू यांचा मोबाईल चार्जरच्या वायरने झोपेत गळा हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

एकूणच क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याने पंचवटी परिसरात खळबळ उडाली असून या खुनाची घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.