हॉटेलमध्ये प्रियकराला भेटायला गेली होती महिला, मग दोघांमध्ये वाद झाला अन् पुन्हा परतलीच नाही !
विवाहित महिलेचे नात्यातील तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. तरुणाचे लग्न ठरले, यामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
नोएडा : अनैतिक संबंध ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. प्रियकराने हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. मग दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर प्रियकराने महिलेची हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. महिलेला दोन मुलं असून, ती पतीसोबत नोएडात राहत होती. सोनू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नात्यातील तरुणाशी महिलेचे अनैतिक संबंध होते
मयत महिला विवाहित असून, तिला दोन मुले देखील आहेत. मात्र तरीही तिचे नात्यातील सोनू नामक तरुणाशी अनैतिक संबंध सुरु होते. शुक्रवारी दुपारी सोनूने महिलेला ओयो हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. दोघांनी हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. रुममध्ये गेल्यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. सोनूचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरले होते. याच कारणातून दोघांमध्ये वादावादी सुरु होती.
वाद विकोपाला गेला अन् अनर्थ घडला
अखेर वाद टोकाला गेला अन् सोनूने महिलेला जबर मारहाण केली. यात महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ हॉटेलमध्ये धाव घेत मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोनूविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. महिलेच्या मृत्यूमुळे दोन मुले अनाथ झाली आहेत.
ग्रेटर नोएडात हुंड्यासाठी महिलेला संपवले
माहेरुन हुंडा आणत नसल्याने ग्रेटर नोएडात एका महिलेची सासरच्यांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरचे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.