एका महिलेचे पती आणि पत्नीसोबत संबंध, सत्य उजेडात आल्यानंतर पोलिसांना फुटला घाम
ज्यावेळी पवनचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यावेळी पोलिसांनी पाच लोकांना ताब्यात घेतलं, चौकशी केली असता भयानक प्रकरण उजेडात आलं.
पटना : राजधानी पटना (Patna) येथील दानापुरमधून (danapur) एक भयानक घटना पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिस सुध्दा चक्रावून गेले आहेत. एका महिलेचे पती आणि पत्नीसोबत संबंध होते. त्यानंतर पतीची हत्या करण्यात आली, ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याचं नाव पवन राम (pavan ram) असं आहे. पोलिसांनी हत्या झाल्यानंतर चौकशीसाठी पाच लोकांना ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीच्या काळात प्रेयसीनं नाराज असल्यामुळे हत्या केल्याचं सांगितलं होतं. त्या प्रकरणात नाव ट्विस्ट आला आहे. आरोपी महिलेला मृत पतीच्या बायकोसोबत समलैगिंक संबंध ठेवायचं होतं.
दानापूरमध्ये ट्रक चालक पवन रामची हत्या झाली, त्याला कित्येक दिवस होऊन गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमिका राणीला पवन रामच्या बायकोसोबत समलैगिंक संबंध ठेवायचे होते. त्यामुळे आरोपी महिलेने पतीला सुरुवातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर पवनला त्याच्या बायकोसोबत समलैगिंक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्याने विरोध केला. राणीला पवनची बायको निशूसोबत कोणत्याही परिस्थिती राहायचं होतं. त्यामुळे आरोपी महिलेने पवनची हत्या केली.
अशा पद्धतीने केली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार निशू-राणीची पहिली भेट एक वर्षापुर्वी एका रुग्णालयात झाली होती. त्यानंतर दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. त्यामुळं राणीला आता निशू सोबत राहायचं होतं. राणी काहीवेळेला निशुच्या घरी जाऊन राहत होती, परंतु पवनला ती गोष्ट अजिबात आवडतं नव्हती. एक महिन्यापुर्वी राणी पवनच्या घरी जाऊन थांबली होती. त्यावेळी पत्नी निशू आणि पवनमध्ये मोठं कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी राणीला खूप वाईट वाटलं. त्यानंतर काही लोकांना सोबत घेऊन राणीने पवन रामची हत्या केली.
ज्यावेळी पवनचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यावेळी पोलिसांनी पाच लोकांना ताब्यात घेतलं चौकशी केली असता भयानक प्रकरण उजेडात आलं.