उस्मानाबाद / संतोष जाधव (प्रतिनिधी) : आर्थिक देवाण घेवाणीतून झालेल्या वादातून शामराव देशमुख आणि धीरज हुंबे हे दोघेही उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतात. तसेच दोघेही शहरातील कुरणेनगर परिसरात राहत होते. दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाण होती. खळबळजनक घटना उस्मानाबादमध्ये उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांमध्येच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शामराव देशमुख असे हत्या करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे, तर धीरज हुंबे असे हत्या करणाऱ्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
शामराव देशमुख आणि धीरज हुंबे हे दोघेही उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतात. तसेच दोघेही शहरातील कुरणेनगर परिसरात राहत होते. दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाण होती. याच व्यवहारातून दोघांमध्ये वाद झाला. मग वाद विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत धीरज हुंबे याने डोक्यात दगड घालून शामराव देशमुख यांची हत्या केली.
घटनेची माहिती उस्मानाबाद शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसंनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी शिक्षकाला अटक करत त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. दोघा शिक्षकांमध्ये नेमका काय आर्थिक व्यवहार होता, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.