दिव्यांग दुकानदार मित्रासोबत दुकानात बसला होता, नंतर जे घडले त्याने सर्वच हादरले, काय घडले नेमके?

नेहमीप्रमाणे तो दुकान खोलून दुकानात बसला. इतक्यात त्याचा मित्रही त्याला भेटायला आला. दोघे मित्र एकमेकांशी गप्पा मारत होते. इतक्यात जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

दिव्यांग दुकानदार मित्रासोबत दुकानात बसला होता, नंतर जे घडले त्याने सर्वच हादरले, काय घडले नेमके?
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 9:21 PM

पाटणा : कुणाला व्यंगत्वावरून हिणवू नये, असा संदेश सामाजिक पातळीवर वेळोवेळी दिला जातो. मात्र हा संदेश कोण किती गांभीर्याने घेते हा प्रश्नच आहे. पाटण्यात एका दिव्यांग व्यक्तीची हत्या झाली, त्यामागे त्या व्यक्तीचे व्यंगत्व कारण होते. पोलीस तपासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पती दिव्यांग आहे हे आवडेनासे झाल्यानंतर परपुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने दिव्यांग पतीची हत्या केली. मगन यादव असे हत्या झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. मगन हा नेहमीप्रमाणे दुकानात गेला होता. त्यावेळी दुकानात आलेल्या दोघांनी मगनवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पाटण्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पत्नीला तिच्या प्रियकरासह अटक

पाटणा येथील खुसरुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सहीम चक गावात 13 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. गोळीबार करून मारेकरी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी सखोल तपास करून हत्याकांडाचा छडा लावण्यात यश मिळवले. मगनच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून मगनची गोळ्या झाडून हत्या घडवून आणली. या प्रकरणात पोलिसांनी मगनची पत्नी सोनी देवी व तिचा प्रियकर सूरज कुमार उर्फ उदय यादव या दोघांना अटक केली आहे.

सुरुवातीला हत्याकांडातील सहभाग नाकबूल करणाऱ्या सूरज कुमारने पोलिसांच्या दणक्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून या घटनेत वापरण्यात आलेल्या देशी बनावटीच्या कट्ट्याशिवाय एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. तसेच आणखी एका आरोपीला पकडण्यासाठी छापासत्र सुरु ठेवले आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी प्रेमीयुगुल होते लग्नाच्या तयारीत

दिव्यांग दुकानदार मगन यादवची पत्नी सोनी देवी आणि तिचा प्रियकर सूरज कुमार यांनी हत्येचा कट रचला होता. सोनी देवी हिला मगन हा दिव्यांग असल्यामुळे आवडेनासा झाला होता. याचदरम्यान सोनीचे बारहमधील पंडरक येथील सूरज कुमारसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघे लग्न करण्याच्या तयारीत होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मगनला मिळाली होती. त्याने तीव्र विरोध सुरु केल्यानंतर सोनीने मगनचा काटा काढण्याचा निश्चय केला होता. त्याच कटानुसार सुरजने दुसऱ्या मित्रासोबत 13 मे रोजी भरदिवसा मगनच्या दुकानात जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.