सासूच्या पैशावर होता जावयाचा डोळा, मग पैसे मिळवण्यासाठी जावयाने जे केले ते पाहून सर्वच हादरले !

पाच दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह नाल्यात सापडला होता. या प्रकरणाचा तपास करत प्रकरणाचा उलगडा केला असता सर्वांना धक्काच बसला.

सासूच्या पैशावर होता जावयाचा डोळा, मग पैसे मिळवण्यासाठी जावयाने जे केले ते पाहून सर्वच हादरले !
कल्याण स्थानकात तरुणीची छेडछाड
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 10:33 PM

पाटणा : पैशासाठी जावयानेच मेव्हण्याच्या मदतीने सासूचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बिहारमधील पाटणा शहरात घडली आहे. शहरातील एका नाल्यात सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पैशांच्या हव्यासापोटी बबिता देवी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येच्या कटात बबिता देवीच्या बहिणीच्या जावयाचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. बबिता देवीच्या बहिणीचा जावई गुड्डू कुमार आणि त्याचा मेव्हणा सूरज कुमार उर्फ फंटुश या दोघांनी पैशासाठी हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येसाठी वापरलेली रिक्षा आणि महिलेचे 2 लाख 63 हजार रुपये हस्तगत केले आहेत.

पाच दिवसांपूर्वी नाल्यात पडला होता मृतदेह

बायपास पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धवलपुरा भागातील नाल्यात 15 मे रोजी बबिता देवी हिचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याचा गुन्हा पाटणा पोलिसांनी दाखल केला होता. त्यानंतर तपासचक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले. हत्या झालेली बबिता देवी ही गया जिल्ह्यातील सिकारिया बेलदार बिघा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. अधिक तपासात तिच्या हत्येमागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला आहे.

आरोपींनी दिली हत्येच्या गुन्ह्याची कबुली

आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा उलगडा करण्याचे आव्हान होते. बबिता देवी हिने नुकतीच संपतचक येथील आपली जमीन विकली होती. त्यातून आलेल्या पैशांतून तिने दुसऱ्या ठिकाणी जमीन खरेदी केली होती. जमीन खरेदी करूनही तिच्याकडे आणखी पैसे उरले होते. त्या पैशांवर गुड्डू कुमारचा डोळा होता. तेच पैसे लाटण्यासाठी त्याने बबिता देवीची हत्या केली.

हे सुद्धा वाचा

हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकला

आरोपी गुड्डू कुमार आणि सूरज कुमार उर्फ ​​फुंटुश या दोघांनी 14 मे रोजी बबिता देवीला बहाणा करून आपल्या घरी बोलावले. नंतर तिची हत्या करण्यात आली. घटनेच्या रात्री उशिरा दोघांनी बबिता देवीचा मृतदेह रिक्षातून ढवळपुरा बाहेरील नाल्यात फेकून दिला. नंतर बबिता देवीच्या भाड्याच्या घरात जाऊन तिने विकलेल्या जमिनीची रक्कम चोरून नेली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.