थाळीचं आमिष भोवलं, बसला लाखो रुपयांना गंडा, जेवणाची ऑर्डर करताना काळजी घ्या नाहीतर होईल अशी फसवणूक

फेसबुकवर एका प्रसिद्ध हॉटेलची जाहिरात होती. या जाहिरातील एकवर एक फ्री थाळीची ऑफर होती. ही ऑफर पाहून महिलेलाही एकवर एक थाळी घेण्याची हाव सुटली.

थाळीचं आमिष भोवलं, बसला लाखो रुपयांना गंडा, जेवणाची ऑर्डर करताना काळजी घ्या नाहीतर होईल अशी फसवणूक
पुण्यात फ्री थाळीचे आमिष दाखवत महिलेची फसवणूकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 4:02 PM

अभिजीत पोते, पुणे : पुण्यात फसवणुकीची एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पुण्यात ‘एकावर एक फ्री’चं आमिष एका महिलेला चांगलंच भोवलं आहे. एकावर एक फ्री थाळी घेण्याच्या नादात महिलेला 400 रुपयांची थाळी 2 लाखांना पडली आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेलची ऑफर असल्याचे भासवत बँकेतून रक्कम गायब केली. केरळमधील सायबर चोरट्यांनी पुण्यातील महिलेची 2 लाख रुपयांची फसवणूक केली. यानंतर महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्या वर्षभरात या नामांकित हॉटेलचे नाव वापरून पैसे उकाळण्याची ही पाचवी घटना आहे.

फेसबुकवर जाहिरात पाहून महिलेने थाळी ऑर्डर केली

फेसबुकवर या नामांकित हॉटेलची एका थाळीवर एक थाळी फ्री देणार अशी एक जाहिरात होती. या महिलेने ही जाहिरात पहिली होती. त्या जाहिरातीवर फोन नंबर देण्यात आला होता. त्या नंबरवर त्यांनी संपर्क केला असता केरळमध्ये असलेल्या या सायबर चोरट्यांनी ऑर्डर करण्यासाठीचे आणि पेमेंट करण्यासाठी लागणारे सर्व डिटेल्स मागितले. यावेळी महिलेने तिच्याकडील क्रेडिट कार्डची माहिती देताच, काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख रुपये गायब झाले होते.

शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मुंबईतील एका महिलेला तब्बल 31 लाखांचा गंडा घातल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तीन आरोपींना मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली आहे. कल्याणसिंग करणसिंग चंदेल उर्फ पियुष अग्रवाल, अनुज रामनारायण भगोरिया, भीमसिंग गोवर्धन मिना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 1 लॅपटॉप, 9 मोबाईल, 8 सिम कार्ड, 15 डेबिट कार्ड, 2 पासबुक आणि 1 चेकबुक जप्त करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.