पिस्तुलचा धाक दाखवून सासऱ्याचे हॉटेल नावावर करुन घेतले, सांस्कृतिक शहरात चाललंय काय?

संपत्तीसाठी श्रीमंत मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करत त्यांची संपत्ती हडपण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशीच एक घटना विद्येचे माहेरघर आणि सास्कृतिक शहरात घडली आहे.

पिस्तुलचा धाक दाखवून सासऱ्याचे हॉटेल नावावर करुन घेतले, सांस्कृतिक शहरात चाललंय काय?
वरळी सी-फेसवर तरुणीचा मृतदेह आढळलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 12:15 PM

पुणे : पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहितेला पिस्तुलचा धाक दाखवून हॉटेलची पॉवर ऑफ अॅटर्नी नावावर करुन घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या तक्रारीवरुन कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत विनायकराव जाधव, अभिजित विनायकराव जाधव, विनायकराव जाधव आणि वैशाली विनायकराव जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विक्रम गौड अधिक तपास करीत आहेत.

रोजच्या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी गेली

मुख्य आरोपी विश्वजीत आणि पीडितेचा चार-पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर विवाहितेचा सासरी शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. तसेच पतीने तिला ड्रग्ज आणि दारु पाजून तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंधही केले होते. यानंतर सर्व छळाला कंटाळून विवाहिता सासरचे घर सोडून माहेरी गेली. विवाहितेच्या वडिलांचे पुण्यात प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलची पॉवर अॅटर्नी विवाहितेच्या नावावर आहे.

गेल्या आठवड्यात बळजबरीने पतीने हॉटेल नावावर करुन घेतले

गेल्या आठवड्यात आरोपी आणि पीडितेची भेट झाली. यावेळी आरोपीने पिस्तुलचा धाक दाखवून महिलेकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ अॅटर्नी आपल्या नावावर करुन महिलेच्या वडिलांचे हॉटेल नावावर करुन घेतले. तसेच आरोपीने कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या कोट्यावधींच्या 4 कारची परस्पर विक्री करुन विवाहितेची फसवणूक केली. विवाहितेचे 1 कोटी 70 लाख रुपयांचे लग्नातील दागिने आणि वस्तू तसेच दोन कार आरोपी आणि त्याचा भाऊ वापरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.