चंदीगड : पंजाबमधील(Punjab) SBI बँकेवर धाडसी दरोडा पडला आहे. ही बँक कुणी सराईचत दरोडेखोराने नाही तर अवघ्या बारा वर्षाच्या पोराने लुटली आहे. या बारा वर्षाच्या मुलाने बँकेतील तब्बल 35 लाखांच्या रोकडवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे या मुलाने डायरेक्ट कॅशियरच्या केबिनमध्ये घुसून ही चोरी केली आहे. या मुलाचा चोरी करतानाचे कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलाचा आणि त्याच्या साथीराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे.
पंजाबमधील पटियाला येथील एका एसबीआय बँकेच्या शाखेत हा दरोडा पडलाय. बँकतेतून तब्बल 35 लाख रुपयांची रोकड या या बारा वर्षाच्या मुलाने लुटली आहे. चोरीच्या या घटनेने पोलिसही हैराण झाले आहेत. 35 लाख रुपयांनी भरलेली बॅग कॅशियरने एटीएममध्ये भरण्यासाठी ठेवली होती. हा मुलगा थेट कॅशियरच्या केबिनमध्ये घुसला आणि त्याने ही बॅगच चोरुन नेली आहे.
बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कॅशिअरच्या कॅबिनमध्ये घुसून त्याने ही बँग लंपास केली. त्याच्या साथीदाराच्या मदतीने मुलाने ही चोरी केलेय. नोटांनी भरलेली ही बॅग इतकी जड होती की त्याला ही बॅग उचलतही नव्हती. त्याने ओढत खेचत ही बॅग बँकेच्या बाहेर नेली. इथे त्याचा साथीदार रिक्षा घेवून उभाच होता. यानंतर दोघांनी बॅग घेवून रिक्षात बसून फरारा झाले.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मुलाला बॅग चोरीचे प्रशिक्षण देण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय कॅबिनमध्ये कुणालाही एंट्री नसते. तरीही हा मुलगा कॅबिनमध्ये कसा काय घुसला? ही बॅग नेताना बँकेतील कर्मचाऱ्यांनी या मुलाला पाहिले नाही का? मुलाला पकडण्यासाठी बँकेत सुरक्षा रक्षक नव्हता का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेत बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आता बँकेतील त्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे.