पहिल्या पतीची मुलं नकोशी झाली; अखेर दुसऱ्या पतीने जे केले ते पाहून सर्वांचाच थरकाप उडाला
पत्नी मुलांना सोडून घरी येण्यास तयार नसल्याने संतापलेला कुलदीप काल दारुच्या नशेत आपल्या साथीदारांना घेऊन सासरवाडीला गेला. यावेळी त्याचे सासू-सासरे, पत्नी आणि दोन मुले गाढ झोपले होते.
पंजाब : पत्नी मुलांना सोडून सोबत नांदायला यायला तयार नसल्याने संतापलेल्या पतीने पत्नीसह सहा जणांना जिवंत जाळल्याची (Burn Alive) घटना पंजाबमधील जालंधर (Jalandhar Punjab) येथे घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार (Accuse Absconding) झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेत आरोपीची पत्नी, दोन मुले, सासू आणि सासरे यांचा जळून मृत्यू झाला आहे. आरोपीने आपल्या साथीदारांसह हे जळीतकांड केले आहे. कुलदीप सिंह उर्फ कल्लू असे आरोपीचे नाव आहे.
कुलदीपची पत्नी परमजीतचा होता दुसरा विवाह
मयत सुरजन सिंह हे एक मजुर आहेत. मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. सुरजन यांची मुलगी परमजीत हिचा विवाह आठ वर्षापूर्वी झाला होता. मात्र तिच्या पहिल्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले. परमजीत दोन मुले होती. यामुळे सुरजन यांनी मुलगी आणि नातवंडांच्या काळजीपोटी तिचा कुलदीप सिंह यांच्याशी दुसरा विवाह लावून दिला.
आरोपी पत्नीच्या मुलांना स्वीकारण्यास तयार नव्हता
विवाहानंतर काही दिवसांनीच कुलदीप पत्नी आणि मुलांना मारहाण करु लागला. परमजीतच्या पहिल्या पतीच्या मुलांना स्वीकारण्यास तयार नव्हता. तो वारंवार मुलांना दुसरीकडे सोडण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता. यामुळे वैतागून परमजीत मुलांना घेऊन माहेरी राहत होती.
पत्नी मुलांना सोडून घरी येण्यास तयार नसल्याने संतापलेला कुलदीप काल दारुच्या नशेत आपल्या साथीदारांना घेऊन सासरवाडीला गेला. यावेळी त्याचे सासू-सासरे, पत्नी आणि दोन मुले गाढ झोपले होते.
दाराला बाहेरुन कडी लावून पेटवून दिले
कुलदीपने दरवाज्याला बाहेरुन कडी लावली. त्यानंतर घरावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. या आगीत सासरे सुरजन सिंग, सासू जांगीद्रो, पत्नी परमजीत, मुलगा गुरमोहल आणि मुलगी अर्शदीप यांचा मृत्यू झाला. यानंतर कुलदीप तेथून पसार झाला.
शेजाऱ्यांनी आग पाहताच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले.