गरबा खेळू न दिल्याचा राग, तिघांवर हातोड्याने वार; एकाचा दुर्दैवी अंत

वेडेवाकडे कृत्य करणाऱ्या तरुणाला रबाळे एमआयडीसी भागात नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्यास तिघांनी मज्जाव केला होता.

गरबा खेळू न दिल्याचा राग, तिघांवर हातोड्याने वार; एकाचा दुर्दैवी अंत
गरबा खेळू न दिल्याचा राग, तिघांवर हातोड्याने वारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 5:27 PM

नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : गरबा खेळू न दिल्याच्या रागातून एका तरुणाने तिघांवर लोखंडी हातोड्याने हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील रबाळे (Rabale, Navi Mumbai) येथे घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आकाश जयस्वाल असे मयत तरुणाचे नाव आहे. रबाळे पोलिसांनी (Rabale Police) आरोपी तरुणाला अटक केली आहे.

दांडिया खेळू न दिल्याने तिघांवर हल्ला

वेडेवाकडे कृत्य करणाऱ्या तरुणाला रबाळे एमआयडीसी भागात नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्यास तिघांनी मज्जाव केला होता. याचाच राग आरोपीच्या मनात सळसळत होता. याच रागातून आरोपीने तिघांवर लोखंडी हातोड्याने हल्ला केला.

जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांपैकी आकाश जयस्वाल या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जितेंद्र पटवा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा

पीडित तरुण झोपेत असताना मध्यरात्री त्यांच्यावर हल्ला

आरोपी हा वेडेवाकडे नाचत होता. दुर्गादेवी समोर असला नाच न करण्याचे सांगितल्यानंतरही वेडवाकडे नृत्य करत असल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आले होते. हाच राग मनात ठेऊन आरोपीने मध्यरात्री मंडपात झोपलेल्या तिघांना मला दांडीया का खेळू दिला नाही असा जाब विचारत त्याच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.