आधी फोन करुन कॅब बुक केली, मग कॅब चालकाला…, त्याने असा काय गुन्हा केला की त्यांनी थेट…

त्यांनी कॉल करुन कॅब बुक केली. तो बिचारा निष्पाप कार घेऊन ग्राहकाच्या सेवेसाठी हजर झाला. पण त्याला कुठे माहित होते ग्राहकाच्या मनात काय चाललंय.

आधी फोन करुन कॅब बुक केली, मग कॅब चालकाला..., त्याने असा काय गुन्हा केला की त्यांनी थेट...
गाडी लुटण्यासाठी त्यांनी कॅब चालकालाच संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 7:10 PM

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कॅब चालकाची हत्या करुन त्याचा मृतदेह घराच्या अंगणात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॅब चालकाची गाडी हडपण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. राकेश कुर्रे आणि तपन बांधे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. सुनील वर्मा असे मयत चालकाचे नाव आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी चालकाचा मृतदेह आणि गाडी ताब्यात घेतले आहे.

कॅब चालक अचानक गायब झाला होता

सुनील वर्मा हा 15 एप्रिल रोजी अचानक गायब झाला. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी फिर्याद नोंदवत प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी शेवटची कॅब कुणी बुक केली होती याची माहिती काढली. त्यानुसार शेवटची कॅब बुक करणाऱ्या राकेश कुर्रेला ताब्यात घेतले. राकेशची चौकशी केली असता सुरवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले

मात्र त्याच्याविरोधात पुरावे असल्याने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी घटनास्थळी दाखल सुनीलचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच आरोपींकडून सुनीलची गाडीही जप्त केली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही आरोपीने सुनील वर्मा याची गाडी भाड्याने घेतली होती. सुनीलशी त्याचे चांगले संबंध होते.

हे सुद्धा वाचा

सुनियोजित प्लान करुन सुनीलची हत्या

सुनीलची माहिती राकेशने त्याचा मित्र तपनला दिली. दोघांनी मिळून कार भाड्याने बुक करायची आणि त्यानंतर सुनीलची हत्या करून गाडी विकून पैसे वाटून घ्यायचे, असा दोघांनी प्लान केला. सुनियोजित प्लॅननुसार 14 एप्रिल रोजी आरोपींनी सुनील वर्मा याला कार बुकिंगच्या नावावर फोन करून खोला गावात बोलावून घेतले.

सुनील गावात पोहोचताच रात्री 12 वाजता आरोपींनी त्याची कालव्याजवळ हत्या केली. सुनीलची हत्या केल्यानंतर आरोपींनी राकेश कुर्रे याचे घर गाठून मृतदेह घराशेजारील अंगणात गाडून गाडी लपवून ठेवली. आरोपी कार विकण्यासाठी ग्राहक शोधत होते. ओळख पटू नये म्हणून गाडीची नंबर प्लेटही आरोपींनी काढून टाकली होती.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.