Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती 27 वर्षांची तो 49 वर्षांचा, शेवटी बापाचं काळीज, मुलीला प्रेमसंबंधांना विरोध केला म्हणून…

मुलीचे वयापेक्षा 22 वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. पित्याला ते मंजूर नव्हते. पित्याने तिचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरवले. पण हे लग्न पार पडण्याआधीच भयंकर घडले.

ती 27 वर्षांची तो 49 वर्षांचा, शेवटी बापाचं काळीज, मुलीला प्रेमसंबंधांना विरोध केला म्हणून...
कौटुंबिक वादातून आईने मुलाला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 3:24 PM

चित्तोडगढ : प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या बापाचाच काटा काढल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. चित्तोडगढ पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाचा उलगडा करण्यास यश आले आहे. पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरु आहे. सुशीला उर्फ सुष्या गाडरी आणि बाबूलाल तेली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गमेर गाडरीने 3 मे रोजी आपल्या मुलीचे लग्न ठरवले होते. मात्र लग्नाच्या दोन दिवस आधीच मुलीने बापाचा काटा काढला.

पुतण्याने काका बेपत्ता झाल्याची तक्रार दिली

कोलपुरा येथील गमेर गडरी यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार 1 मे रोजी कापसन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी बेपत्ता गडरी यांचा शोध सुरु केला. यादरम्यान रोलिया गावातील सहार्ड येथील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आढळून आला. तपासात बेपत्ता गमेर गडरी याचाच हा मृतदेह असल्याची खात्री पटली. त्यानंतर मृताचा पुतण्या उदयालाल गडरी याने गमेर गडरी यांच्या हत्येची भीती व्यक्त केली होती. यावरून या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात आली.

हत्येचे सत्य उलगडताच पोलिसांसह सर्वच चक्रावले

प्रकरणाचा कसून तपास करत अखेर पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. सत्य उघड होताच पोलीसही हैराण झाले. गडरी याच्या मुलीच्या सांगण्यावरुन तिच्या प्रियकराने पित्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. गडरी याची मुलगी सुशीला उर्फ ​​सुश्या गडरी हिचे शेजारील गावातील बाबूलाल तेली याच्याशी सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सुशीला 27 वर्षाची आहे, तर बाबुलाल हा 49 वर्षाचा आहे. गमेर गडरी याला हे संबंध मंजूर नव्हते. त्याने आपल्या मुलीचा तिच्या वयाच्या तरुणाशी विवाह ठरवला होता. 3 मे रोजी हा विवाह होणार होता. तत्पपूर्वीच मुलीने पित्याचा काटा काढला. मग मृतदेह विहिरीत टाकला.

हे सुद्धा वाचा

पद्धतशीरपणे कट रचून पित्याला संपवले

लग्नाची तारीख जवळ येत होती तसे आरोपींनी गमेर गडरीचा काटा काढण्याचा कट रचला. प्लाननुसार, मुलीने 29 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास वडिलांना काही कामासाठी विहिरीकडे पाठवले. तेथे आरोपी बाबूलाल तेली याने जैतपुराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गमेर गडरी याला मोटारसायकलवरून नेले. मग विहिरीजवळ नेत त्याला दुचाकीवरून खाली पाडले. नंतर त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिला.

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.