Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहा वर्षे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, मग अचानक काय घडले की त्याने तिला थेट यमसदनीच धाडले !

दोघांचे अनैतिक प्रेमसंबंध होते. दहा वर्षांपासून दोघेही आपापल्या जोडीदाराची फसवणूक करत होते. अखेर या नात्याचा भयानक अंत पाहून सर्वांनाच धक्का बसला.

दहा वर्षे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, मग अचानक काय घडले की त्याने तिला थेट यमसदनीच धाडले !
हळूहळू दोघे भेटू लागले, काही दिवसांनी या दिग्गज खेळाडूने तिचं मन जिंकलं. शेवटी तिने विवाहित नवऱ्याला 1999 मध्ये घटस्फोट दिला आणि खेळाडूसोबत लग्न केलं.Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 4:08 PM

भीलवाडा : राजस्थानमध्ये अनैतिक प्रेमातून आणखी एक भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. रोजच्या वादाला कंटाळून पिच्छा सोडवण्यासाठी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना भीलवाडा जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली. प्रेयसीची हत्या करुन आरोपी फरार झाला आहे. दौलत सिंह राजपूत असे फरार आरोपीचे नाव आहे. घटनेची महिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दहा वर्षापासून सुरु होते अनैतिक संबंध

आरोपी दौलत सिंह आणि मयत प्रेमलता हे एकाच फॅक्टरीत काम करत होते. दोघांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. दौलतला दारुचे व्यसन होते. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. यामुळे दौलतला प्रेमलतापासून पिच्छा सोडवायचा होता. यासाठी त्याने थंड डोक्याने प्रेमलताच्या हत्येच्या कट रचला. त्यानुसार दौलत प्रेमलताला फिरण्याच्या बहाण्याने शुक्रवारी जंगल परिसरात घेऊन गेला. तेथे नेत त्याची तिची हत्या केली. मग मृतेदहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचला. त्यानंतर दौलत फरार झाला आहे.

आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना दौलत आणि प्रेमलताच्या नात्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे दौलतवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दौलतचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करत आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने हत्येची कबुली दिली आहे.

हे सुद्धा वाचा

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.