मुलगा घरी आला तर आई-वडील घरी नव्हते, आईला फोन केला तर बाहेर आहे म्हणाली, मग जे समोर आलं ते…

मुलगा सासरवाडीला गेला होता. तेथून त्याने आईशी बोलणं केलं तेव्हा आईने ती वडिलांसोबत बाहेर जात असल्याचे सांगितले. यानंतर मुलगा जेव्हा सासरवाडीहून परतला तर भलतंच समोर आलं.

मुलगा घरी आला तर आई-वडील घरी नव्हते, आईला फोन केला तर बाहेर आहे म्हणाली, मग जे समोर आलं ते...
अनैतिक संबंधातू पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 4:51 PM

बारा : राजस्थानमधील बारा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह अर्धवट जाळून विहिरीत फेकला. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख पटवली असता तो शिवचरण यांचा असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणाचा छड लावण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी शिवचरणच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नी पुष्पाबाई आणि तिचा प्रियकर नरेश जाटव यांना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी शिवचरणच्या हत्येची घटना घडवून आणल्याची कबुली दिली. शिवचरणच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

मुलगा घरी आला तर आई-वडील गायब होते

भोयल येथील रहिवासी शशिभूषण जाटव याने 6 जून रोजी कसबठाणा पोलीस ठाण्यात आई-वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. शशिभूषण 3 जून रोजी सासरवाडीला गेला होता. यावेळी त्याचे आई-वडील घरीच होते. मात्र तो सासरवाडीहून परतला असता त्याची आई पुष्पाबाई आणि वडील शिवचरण जाटव घरी नव्हते. खूप शोधाशोध करूनही त्यांचा काही सुगावा लागला नाही.

शशिभूषणने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे आईशी फोनवर बोलणे झाले होते. आईने त्याला बाहेर कुठेतरी जात असल्याचेही सांगितले. त्यानंतर शशिभूषण याने वडील शिवचरण यांच्याबाबत विचारणा केली असता, नंतर बोलण करुन देते असे सांगून त्याची दिशाभूल केली. यावरून पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला. त्यानंतर बुधवार, 7 जून रोजी गावाजवळील विहिरीत अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह शिवचरणचा असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

आरोपींकडून हत्येची कबुली

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर मृतेदह शिवचरणचाच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर शिवचरणचा भाऊ मंगी जाटव याने पोलिसात आणखी एक तक्रार दिली. त्यात त्याने मेहुणी पुष्पाबाई आणि शेजारी राहणाऱ्या नरेश जाटव यांच्यावर भाऊ शिवचरणचा खून केल्याचा आरोप केला. कुटुंबीयांच्या अहवालावरून पोलिसांनी पुन्हा हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.