चित्रपट पाहायला जोडपं गेलं होतं, इंटरवलनंतर नवऱ्याच्या आयुष्यात आला खरतनाक क्लायमॅक्स; बायकोने….

राजस्थानच्या जयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवविवाहित जोडपं चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलं. पण इंटरवलनंतर पतीच्या आयुष्यात मोठी घटना घडली.

चित्रपट पाहायला जोडपं गेलं होतं, इंटरवलनंतर नवऱ्याच्या आयुष्यात आला खरतनाक क्लायमॅक्स; बायकोने....
सिनेमागृहात चित्रपटाचा पहिला भाग पाहिला आणि इंटरवलनंतर बायकोने केलं असं की..!
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 7:29 PM

जयपूर : राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिनेमा पाहण्यासाठी नवविवाहित जोडपं गेलं होतं. हा सिनेमा पतीच्या आयुष्याला मोठा धक्का देणारा ठरला. कारण सिनेमागृहातून इंटरवलनंतर पत्नी अचानक बेपत्ता झाल्याने पतीच्या पायाखालची जमीनच सकरली. लग्न होऊन फक्त सात दिवसच झाले होते. इंटरवलमध्ये पती खाण्या पिण्याचं सामना घेण्यासाठी गेला आणि परतला तर त्याला तिथून पत्नी बेपत्ता झाल्याचं कळलं. यामुळे त्याने संपूर्ण सिनेमागृह शोधून काढलं. प्रत्येक सीटवर त्याने शोधाशोध घेतली मात्र त्याला ती कुठेच दिसली नाही. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

जयपूरमधील 33 वर्षीय तरुणाचं 25 जून रोजी शाहपुरा येथील तरुणीशी लग्न झाल होतं. सात दिवसानंतर तो तिला जयपूरच्या पिंक स्क्वॉटल मॉलमध्ये फिरण्यासाठी घेऊन गेला. तिथे त्यांनी चित्रपट पाहण्याचा प्लान केला. दुपारच्या शोमध्ये दीड वाजता इंटरवल झाला आणि पती खाद्यपदार्थ आणण्यासाठी बाहेर गेला. तेव्हा पत्नीने बेपत्ता झाली होती. सिनेमागृहात शोधाशोध केल्यानंतर ती बाहेर गेल्याचं कळलं.

पतीने तिचं वर्णन करून चौकशी केली तर काही लोकांनी ती टेम्पोत बूसून गेल्याचं सांगितलं. त्यानंतर पतीने बस स्टँडवर जाऊन पत्नीचा शोध घेतला. तसेच तिला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचा फोन स्विच ऑफ असल्याचं कळलं. आपल्या पत्नीसोबत काही चुकीचं तर घडलं नाही याची चिंता लागून होती. अखेर त्याने आदर्शनगर पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली.

पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर काही तासातच यात मोठं ट्विस्ट आलं. पत्नी इथे तिथे न थांबता थेट माहेरी निघून आली होती. शाहपुरा पोलीस ठाण्यात जाऊन तिथे तक्रार नोंदवली की, मी माझ्या मर्जीने पतीला सोडून आली आहे. लग्नानंतर खूश नसल्याचे तिने आपल्या तक्रारीत सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.