ब्युटिशियनच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले आणि घराजवळ पुरले, कुठे घडली धक्कादायक घटना

एका महिलेच्या मृतदेहाचे सहा तुकडे करुन ते आरोपीने घराच्या शेजारीच खड्डा खणून पुरल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

ब्युटिशियनच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले आणि घराजवळ पुरले, कुठे घडली धक्कादायक घटना
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 5:01 PM

तिचे ब्युटीपार्लर त्याच टॉवर मध्ये होते आणि त्याचे दुकानही त्याच टॉवरमध्ये होते. दोघांमध्ये त्यामुळे ओळख झाली होती. परंतू त्याने एकदा तिला घरी बोलावले आणि त्यानंतर तिची हत्या केली. तिच्या शरीराचे सहा तुकडे करुन त्याने आपल्या घराच्या शेजारीच खड्डा खणून त्यात पुरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात अखेर आरोपीला अटक झाली आहे. पोलिस आता या हत्ये मागचे कारण शोधत आहे.

राजस्थानच्या जोधपुर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एक 50 वर्षीय महिला अनिता चौधरी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. अनिता चौधरी असे तिचे नाव असून तिच्या पतीने (मनमोहन चौधरी ) त्याची पत्नी हरविल्याची तक्रार 28 ऑक्टोबरला दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा अनिता चौधरी रिक्षाने ब्युटीपार्लरमधून बाहेर पडल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर रिक्षावाल्याची चौकशी पोलिसांनी केली तेव्हा रिक्षावाल्याने दिलेल्या पत्त्याने आरोपीचे घर पोलिसांना सापडले.

अनिता यांच्या फोनमधून आरोपी गुल मोहम्मद याच्याशी त्यांचा संवाद झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी गंगाना गावातील आरोपीच्या घरी जाऊन तपास केला. सुरुवातीला आरोपीची पत्नी काही माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर तिने खरी माहिती सांगायला सुरुवात केली.पोलिसांनी तिने दारात खणलेल्या 12 फूटाच्या खड्ड्याची माहिती दिली. पोलिसांनी खड्डा उकरुन आतून अनिताच्या मृतदेहाचे प्लास्टीकच्या पिशवीत बांधलेले सहा तुकडे जेसीबीच्या सहाय्याने शोधून काढले.

खूनापूर्वी खड्डा खोदला

अनिता चौधरी हीचे वय 50 आहे. या प्रकरणात अनिता हरविल्यानंतर सीसीटीव्ही फूटेजमधून ती गंगाना गावात रिक्षाने उतरल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपीचे घर शोधून काढत तिच्या मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले आहेत. आरोपी गुल मोहम्मद फरार आहे. त्याने कट रचून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण खून करण्यापूर्वीच त्याने खड्डा खणला होता अशी माहिती उघडकीस आली आहे. अनिता हीच्या मुलाने आपल्या आईला फसवून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे पोस्टमार्टेमला पाठविले आहेत. पुढील तपास सुरु आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.