अकरा वर्षाचा मुलगा अचानक गायब झाला, प्रकरणाचा उलगडा होताच सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !

मुलं मोठी झाल्याचं कारण देत महिला आपल्या प्रियकराला घरी येण्यास मज्जाव करत होती. यामुळे संतापलेल्या प्रियकराने आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी जे केले ते पाहून सर्वच चक्रावले.

अकरा वर्षाचा मुलगा अचानक गायब झाला, प्रकरणाचा उलगडा होताच सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !
घरात दुर्गंधी येत होती म्हणून पोलिसांनी जाऊन पाहिले तर...Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 1:30 PM

सवाई माधोपूर : आईला आपल्या प्रियकरासोबत नको स्थितीत पाहिले म्हणून आईच्या प्रियकरानेच मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. नगेंद्र उर्फ नेगी मीणा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. मुलगा आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने आईच्या प्रियकराने त्याला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी त्याला संपवले. आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आई शेतावर गेल्यानंतर मुलाचे अपहरण केले

हरिपुरा गावात राहणारी गोवर्धनी ही 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे शेतावर कामाला गेली होती. यावेळी तिचा 11 वर्षाचा मुलगा घरी एकटा होता. विजय बैरवा शेतावरुन घरी परतली तेव्हा मुलगा घरी नव्हता. तिने त्याला सर्वत्र शोधले. मात्र तो कुठेही सापडला नाही. अखेर तिने पोलीस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाचा सर्वत्र शोध सुरु केला. यानंतर 8 एप्रिल रोजी हरिपुरा गावातील शेतात मुलाचा मृतदेह आढळला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी, एफएसएल पथक, श्वान पथक आणि सायबर पथकाने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील पुरावे गोळा करत पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. यानंतर पोलीस चौकशीत आईच्या प्रियकरावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली.

हे सुद्धा वाचा

आरोपीने फूस लावून मुलाला शेतात नेले आणि हत्या केली

आरोपी नेगीने 3 एप्रिल रोजी मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवला. त्यानंतर तो रामगढ गावातून कच्च्या रस्त्याने हरिपुरा येथे पोहोचला. यावेळी घराजवळ खेळत असलेल्या प्रेयसीच्या मुलाला त्याने फूल लावून शेतात नेले. यानंतर मुलाची हत्या करुन मृतदेह लपवून ठेवला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.