आधी दाबेली गाडा चालकाशी वाद घातला, मग टोळक्याने…, भररस्त्यातील थरार पाहून नागरिक भयभीत

नेहमीप्रमाणे तरुणा आपलया धंद्यावर काम करत होता. रात्रीच्या सुमारास एक टोळके त्याच्या गाड्यावर आले आणि वाद घालण्यास सुरवात केली. मग या वादाने भयंकर रुप घेतले.

आधी दाबेली गाडा चालकाशी वाद घातला, मग टोळक्याने..., भररस्त्यातील थरार पाहून नागरिक भयभीत
सांगलीत हातगाडा चालकाची टोळक्याकडून हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 11:07 AM

सांगली : कुपवाड शहरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका हातगाडी चालकाची धारदार हत्याराने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शुभम माने असे हत्या झालेल्या हातगाडा चालकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच कुपवाड आणि संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणावर हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. याप्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

यशवंतनगर चौक ते आंबा चौक रस्त्यावर शुभम माने याचा दाबेलीचा गाडा आहे. काल रात्री साडे नऊच्या सुमारास गाड्यावर काही तरुण आले आणि त्यांनी शुभमशी वाद घातला. या वादातून हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर आणि इतरत्र वार केले. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला. यानंतर हल्लेखोर अंधारात पसार झाले.

शुभमवर हल्ला करत याच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार हत्याराने एकूण सात वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या शुभमला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु सुरु असताना त्याचा मृत्यू शुभमवर सात वार झाले आहेत. हल्ल्यानंतर यशवंतनगर चौकात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. याबाबत माहिती मिळताच कुपवाड व संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा प्रकार कुपवाड हद्दीत घडला असल्याचे स्यष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.