दुचाकीवरुन घरी चालला होता, पण वाटेतच ते आडवे आले अन् तो घरी पोहचूच शकला नाही !

रात्रीच्या सुमारास तो आपल्या बाईकवरुन घरी चालला होता. यावेळी दुचाकीवरुन अज्ञता लोकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला रस्त्यात अडवले. यानंतर बामणोलीच्या रस्त्यावर जे घडले ते पाहून सर्व हादरले.

दुचाकीवरुन घरी चालला होता, पण वाटेतच ते आडवे आले अन् तो घरी पोहचूच शकला नाही !
आर्थिक वादातून भररस्त्यात तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 7:36 PM

सांगली / शंकर देवकुळे : पैशाच्या वादातून पाठलाग करत एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना सांगलीत घडली आहे. सांगलीच्या कुपवाड जवळच्या बामणोली येथे निर्घृण खून करण्यात आला आहे. अमर उर्फ गुट्ट्या जाधव असं हत्या करण्यात आलेल्या इसमाचं नाव असून, तो सराईत गुन्हेगार आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भररस्त्यात हा हत्येचा थरार घडला. या घटनेने कुपवाड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

घरी जात असतानाच पाठलाग करत संपवले

मयत अमर जाधव हा रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कुपवाड नजीक असणाऱ्या बामनोली येथील आपल्या घरी चालला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखारांनी त्याचा पाठलाग करत त्याला रस्त्यावर अडवले. काही कळायच्या आतच जाधव याच्यावर एकामागून एक वार केले. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम होऊन तो जागीच ठार झाला. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासाअंतीच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.

आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना

कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी हल्लेखारांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. मयत अमर जाधव उर्फ गुट्ट्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे देखील दाखल आहेत. या खुनाच्या घटनेमुळे शहरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सांगली शहरामध्ये गेल्या आठ दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यावरुन गुन्हेगारांना कायद्याची भिती उरली नाही हेच दिसून येते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.