दोघा भावांमधील कौटुंबिक वाद टोकाला गेला, मग लहान भावासोबत जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
दोघा भावांचा वाद टोकाला गेला. मग मोठ्या भावाने लहान भावाला अद्दल घडवण्यासाठी जे केले ते पाहून सर्वांना धक्काच बसला. मोठ्या भावाने जे केले ते कुणी शत्रूसोबतही करणार नाही.
सोनीपत : हरियाणात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून जे घडले ते भयंकर होते. दोघा भावांमध्ये काही कारणातून वाद होता. हा वाद इतका विकोपाला गेला की मोठ्या भावाने लहान भावासोबत जे केले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल. भावावरील राग काढण्यासाठी मोठ्या भावाने आपल्या पुतण्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. काकाने पुतण्यावर भररस्त्यात गोळी झाडली आणि फरार झाला. जखमी पुतण्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
भररस्त्यात पुतण्यावर गोळी झाडली
सोनीपतमधील कुराड गावात नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. मयत सचिन हा गावातील साहद चौकातून येत असताना त्याचा काका राजेशने त्याच्यावर भररस्त्यात गोळी झाडली. यानंतर राजेश तेथून फरार झाला. गोळीबारात सचिन गंभीर जखमी झाला. त्याच्या वडिलांनी आणि आजोबांनी त्याला एका स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले.
उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मात्र दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सचिनच्या आजोबांच्या फिर्यादीवरुन राजेश विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजेश हा सराईत गुन्हेगार आहे. पोलीस फरार राजेशचा शोध घेत आहेत. राजेशला पकडण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत.
प्रेमाला विरोध केला म्हणून तरुणाने भावोजीलाच संपवला
बहिणीच्या नणंदेसोबत तरुणाचे प्रेमाचे सूत जुळले. दोघे पळूनही गेले, मात्र घरच्यांनी त्यांना शोधले. भावोजीचा या प्रेमाला विरोध होता. याच रागातून तरुणाने आपल्या भावोजीची हत्या करत स्वतःच्या बहिणीचेच कुंकू पुसले. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.