आधी रेकी केली, मग संधी मिळताच हात साफ करत पसार झाले; पण अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्याच !

भरदुपारी दरवाजाची कडी तोडून चोरी केल्याची घटना पेणमध्ये घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

आधी रेकी केली, मग संधी मिळताच हात साफ करत पसार झाले; पण अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्याच !
पेणमधील घरफोडी प्रकरणी आरोपींना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 8:48 AM

पेण, दिनांक 14 जुलै 2023 : भरदुपारी बंद घरे फोडून सोने चोरुन नेल्याची घटना पेण शहरात घडली होती. याप्रकरणी पेण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागने या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान चोरटे सांगलीत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक सांगलीत रवाना झाले. पोलीस आल्याची माहिती मिळताच आरोपी पळून जाऊन लागले. मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि अलिबाग पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन आरोपींना पकडले. लोकेश रावसाहेब सुतार आणि अरुण वसंत पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.

भरदुपारी चोरीची घटना

पेण शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा आणि रामवाडी येथील साई सृ्ष्टी अपार्टमेंट येथे 7 जुलै रोजी भरदुपारी चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरफोडी केली. यावेळी चोरटे 10 तोळे सोने घेऊन पसार झाले. घरफोडी केल्यानंतर चोरटे महाड, महाबळेश्वर मार्गे सांगली येथे गेले. यानंतर अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक अलिबागला रवाना झाले.

गुप्त माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई

सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सांगलीतील लिंगनूर गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस दोन दिवस लिंगनूर गावात दबा धरुन बसले होते. पोलीस आल्याची कुणकुण लागताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन आरोपींना बेड्या ठोकल्या.

हे सुद्धा वाचा

आरोपींकडून चोरी केलेले 3 लाख 29 हजार रुपये किंमतीचे 10 तोळे सोने आणि दरोड्यात वापरण्यात आलेली 8 लाख किंमतीची होंडा कार असा एकूण 10 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर दरोडेखोरांवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 29 गुन्हे दाखल आहेत. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, पोलीस शिपाई लालासो वाघमोडे यांनी प्रकरणाचा यशस्वी तपास आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.