इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण असतो. प्रत्येक जोडप्याच्या मनात सुखी संसाराचे चित्र असते. पण हे स्वप्न भंग झाले तर काय होईल?. अशीच एक घटना इंदूरमध्ये उघडकीस आली आहे. एका तरुणाचा थाटामाटात विवाह पार पडला. मनाप्रमाणे जोडीदार मिळाल्याने तरुण खूप खूश होता. आपल्या जोडीदारासोबत भविष्याची स्वप्ने रंगवत होता. मात्र त्याचा हा आनंद अधिक काळ टिकला नाही. लग्नानंतरच सात दिवसातच जे घडले त्यानंतर नवरदेवासह त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्काच बसला.
लग्नानंतर हनिमूनच्या दिवशी वधूने आपल्याला मासिक पाळी आल्याचे सांगत पतीला जवळ येण्यास रोखले. मग काही ना काही कारण सांगून पत्नी पतीला स्वतःपासून दूर ठेवत होती. यानंतर लग्नानंतर सात दिवसांनी अचानक नवरी घरुन गायब झाली. कुटुंबीयांनी आणि पतीने सगळीकडे तिचा शोध सुरु केला. यानंतर घरच्यांनी घरातील तिजोरी पाहिली तर सोन्याचे-चांदीचे दागिने आणि 3 लाख रुपये रोकड पण गायब होते.
यानंतर सर्वजण लग्न जुळवून देणाऱ्या एजंटकडे पोहचले. तिथे पोहचताच समोर जे दृश्य दिसले त्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. नववधू लग्न जुळवणाऱ्या एजंटसोबत नको त्या अवस्थेत दिसली. यानंतर नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सर्व बाब लक्षात आली. खोटे लग्न करुन तरुणांची लूट करणारी गँग असल्याचे कळताच सर्वांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वराच्या कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडले आणि लग्नाच्या नावाखाली लूटमार आणि फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.