ते तुम्हाला रस्त्यात गाठतील, विश्वासात सुद्धा घेतील, आणि काही क्षणात तुम्ही सगळं….
शहरात वृद्ध नागरिक रस्त्याने पायी जात असतांना त्यांच्या अंगावर सोनं असलेल्या व्यक्तींना विशेषतः लक्ष केले जात आहे. हातचलाखीने किंवा विश्वासात घेऊन फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : नाशिक शहरात रस्त्यात चालता बोलता पुढे चेकिंग सुरू असल्याचे सांगत 80 वर्षीय वृद्ध नागरिकाला गंडविल्याचा ( Fraud Case ) प्रकार समोर आला होता. त्यातील संशयित आरोपींचा शोध लागलेला नसतांना नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक ( Nashik Crime News ) बाब समोर आली आहे. सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेची फसणवुक केल्याचे समोर आले आहे. वृद्ध महिलेच्या अंगावरील लाखों रुपये किमतीचे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण भर दिवसा घडला असून संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नाशिक शहरात वृद्ध नागरिक रस्त्याने पायी जात असतांना त्यांच्या अंगावर सोनं असलेल्या व्यक्तींना विशेषतः लक्ष केले जात आहे. संशयित आरोपी हे हातचलाखीने किंवा विश्वासात घेऊन फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार अवघ्या काही मिनिटातच समोरील व्यक्ती सोनं घेऊन पसार होतो. त्यामुळे बोलण्याच्या नादात तो तुम्हाला घाईघाईत सोनं काढून त्याच्या हातात तो देण्यास भाग पाडत असल्याचे तक्रारदार सांगतात.
रेखा सुभाष पाटील या पायी जात असतांना दोन दुचाकीस्वार आले. महिलेच्या समोर येऊन थांबले आणि आम्ही सीबीयआय अधिकारी आहोत, तुमच्याकडील दागिने पिशवीत टाका असे सांगत अधिकाऱ्यांनी दम भरला.
महिलेने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि दागिने असलेली पिशवी दुसऱ्याच्या हातात दिली आणि बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यामध्ये महिलेने दागिने काढून दिलेली पिशवी घेऊन तो पसार झाला आणि दुसरी पिशवी त्याने महिलेच्या हातात दिली.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही क्षणात हा प्रकार घडला असून वृद्ध नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये आठवडाभराच्या आतमध्ये तिसरी लुटीची घटना घडली आहे.
नाशिकरोड येथे चेकिंग सुरू असल्याचे सांगत लूट केल्याची घटना समोर आली होती तर पंचवटीमध्ये पोलीस असल्याचेच सांगून लूट केल्याची बाब समोर आली होती. आणि आता इंदिरानगरमध्ये सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून लूट केली आहे.
लुटीचा हा फंडा नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिक शहर पोलीसांनी या प्रकरणी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल केला असला तरी संशयित आरोपी अद्यापही हाती लागलेले नाहीत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
वृद्ध नागरिकांच्या अंगावरील दागिने पाहूनच त्यांची लूट केली जात आहे. दुसरी एक बाब म्हणजे दुपारच्या वेळेलाच या घटना घडल्या आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बाब सांगितली जात आहे.
त्यामुळे एकूणच नाशिक शहरात लुटीचा नवा फंडा समोर आला असून वृद्ध नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या भागातील या घटना नाशिक शहरात भीतीचं वातावरण निर्माण करून गेल्या आहे.