असे काय घडले की अल्पवयीन मुलाने आईसह चौघांना संपवले? आरोपीचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले
सध्या अल्पवयीन आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आरोपीने या सर्वांची हत्या कशी व का केली? याबाबत पोलीस शोध घेत आहेत.
धलाई : एका अल्पवयीन मुलाने आई, बहिण आणि आजोबांसह चौघांची हत्या केल्याची घटना त्रिपुरातील धलाई जिल्ह्यातील कमालपूर परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर सर्वांचे मृतदेह त्याने एका खड्ड्यात पुरले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची चौकशी करत आहेत. बादल देबनाथ, समिता देबनाथ,रेखा देबनाथ अशी मृतांची नावे असून, 10 वर्षीय बहिणीचाही यात समावेश आहे.
5 नोव्हेंबर रोजी केली हत्या
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने 5 नोव्हेंबर रोजी आई, बहिण, आजोबा आणि शेजारणीची धारदार शस्त्राने हत्या केली होती. त्यानंतर घराजवळील खड्ड्यात मृतदेह पुरले. ही बाब शेजारच्या लोकांना कळताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढले. सध्या अल्पवयीन आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आरोपीने या सर्वांची हत्या कशी व का केली? याबाबत पोलीस शोध घेत आहेत.
मयतांपैकी बादल देबनाथ हे अल्पवयीन आरोपीचे आजोबा होते. समिता ही आई तर सुपर्णा ही अल्पवयीन आरोपीची बहीण होती. तर रेखा देब त्यांच्या शेजारी राहत होत्या. चौकशीअंतीच आरोपीने हे कृत्य का केले याचा उलगडा होईल.