दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता, ती त्याची वाट पाहत होती, काही वेळात जे समोर आले त्याने कुटुंबीयांना धक्काच बसला !

त्या दिवशा त्याचा लग्नाचा वाढदिवस होता. पत्नीला फोनवर म्हणाला थोड्या वेळात घरी येतो, आपण एकत्र जेवू. पत्नी एकत्र जेवण्यासाठी पतीची वाट पाहत होती. पण तो आलाच नाही.

दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता, ती त्याची वाट पाहत होती, काही वेळात जे समोर आले त्याने कुटुंबीयांना धक्काच बसला !
घरात दुर्गंधी येत होती म्हणून पोलिसांनी जाऊन पाहिले तर...Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 6:39 PM

उज्जैन : तरुणाचा लग्नाचा वाढदिवस होता. त्याने पत्नीला फोन करुन थोड्या वेळात येतो सांगितले. पत्नी आणि घरचे लोक त्याची वाट पाहत होते. पण मध्यरात्र झाली तरी तो आलाच नाही. यानंतर घराबाहेरुन ओरडण्याचा आवाज आला. घरच्यांनी बाहेर जाऊन पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तरुण जखमी अवस्थेत घराबाहेर पडला होता. घरच्यांनी जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत तपास सुरु केला. अंकुर शर्मा असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अंकुर शर्मा पेटी कॉन्टॅक्ट म्हणून काम करायचा.

लग्नाच्या वाढदिवशीच तरुणाची हत्या

बुधवारी अंकुरच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याने पत्नीला फोन करुन सांगितले की, मी थोड्या वेळात घरी येतो, आपण एकत्र जेवण करु. पत्नी आणि कुटुंब रात्री उशिरापर्यंत त्याची जेवायला वाट पाहत होते. मात्र तो आलाच नाही. यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराबाहेर ओरडण्याचा आवाज आला. घरच्यांनी बाहेर येऊन पाहिले तर अंकुर जखमी अवस्थेत पडला होता.

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

हे सुद्धा वाचा

घरच्यांनी अंकुरला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. अंकुरची त्याच्या घराबाहेरच हत्या करण्यात आली. घटनेनंतर अंकुरचे मित्र फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. हत्या नक्की कुणी केली? आणि का केली? याबाबत अद्याप काही कळू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.