Thane Crime : धक्का लागल्याच्या रागातून एका व्यक्तीला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

रात्रीच्या कुकरेजा हे आपल्या घरी जात असतानाच चालताना चुकून त्यांचा धक्का लागला. यामुळे संतपालेल्या टोळक्याने जे केले त्यानंतर एकच खळबळ माजली.

Thane Crime : धक्का लागल्याच्या रागातून एका व्यक्तीला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
क्षुल्लक कारणातून टोळक्याची इसमाला मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 12:51 PM

उल्हासनगर / 18 जुलै 2023 : रस्त्यावरुन चालत जात असताना चुकून धक्का लागल्याच्या रागातून एका व्यक्तीला टोळक्याने भररस्त्यात मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजेश कुकरेजा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

धक्का लागल्याच्या कारणातून मारहाण

राजेश कुकरेजा हे उल्हासनगर कँप 4 परिसरात राहतात. रविवारी रात्री कुकरेजा हे आपल्या घरी जात असताना सतरामदास रुग्णालयाजवळ राजेश यांचा काही तरुणांना धक्का लागला. धक्का लागल्याच्या रागातून टोळक्याने कुकरेजा यांना साथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात कुकरेजा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उल्हासनगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

याप्रकरणी कुकरेजा यांचा मुलगा तरुण कुकरेजा याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोडिया, मनीष दुसेजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. क्षुल्लक कारणातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.