जन्मदात्या पित्यानेच पोटच्या लेकीला प्रेग्नंट केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील( Uttar Pradesh ) अमरोहा येथे घडली आहे. पत्नीच्या निधनानंतर या पित्याने मुलीवरच बालात्कार (Father Raped ) केला. यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. पोलिसांनी वेगाने तपास करत नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत कोर्टात केस उभी केली. यानंतर कोर्टाने आरोपी वडिलाला १४ दिवसांत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच ५३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विशेष (पोक्सो कायदा I) अवधेश कुमार यांच्या न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. यासोबतच ५३ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे. दंडाची अर्धी रक्कम पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारधम बापाला अटक करुन पोलिसांनी त्याची रगवानगी तुरुंगात केली आहे.
डिडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचे वय 50 वर्षे आहे. तो वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करायचा. पत्नीच्या निधनानंतर तो अल्पवीयन मुलीसह कुटंबियांबरोबर राहत होता. जेव्हा जेव्हा घरातील सदस्य घराबाहेर जायचे तेव्हा हा नराधम बाप आपल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करायचा. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तो देत होता असे मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
11 जून रोजी मुलीची प्रकृती अचानक बिघडली. यावेळी ती गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तव कुटुंबातील इतर सदस्यांना कळाले. त्यानंतर नातेवाइकांनी मुलीचे अल्ट्रासाऊंड करून घेतले. त्यात पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेवून विचारले असता नराधम बापानेच हे कृत्य केल्याचे सांगीतले. यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिशन शक्ती योजनेसह तातडीने कारवाई करून जिल्हा न्यायालयाने बलात्कारी पित्याला जन्मठेपेची तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे अवघ्या १४ दिवसांच्या मर्यादित कालावधीत अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला.
झारखंडच्या गढवा जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीयं. अंधश्रद्धेपोटी एका महिलेची तिच्या बहिणीने आणि भाऊजीने अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केलीयं. धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण प्रकार हा अंधश्रद्धेतून घडला आहे. घराच्या बांधकामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिल्या दिवशी या महिलेची जीभ कापली. यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला, जीभ कापल्यानंतर महिला जिवंत होती, मात्र प्रायव्हेट पार्ट कापल्यानंतर या महिलेचा तडकाफडकी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेत मृत महिलेचा नवराही समोर होता, मात्र त्याने यासर्व प्रकाराला विरोध केला नाही. महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेह रांका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरा येथील मामाच्या घरी नेऊन जाळण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी महिलेच्या घरी धाव घेऊन चौकशी केली.