आधी पत्नीचे नाक कापले, मुलीचा…, मग स्वतःही जीवन संपवले, कारण काय?

दोघांचा चारचौघांसारखा संसार सुरु होता. त्यांच्या संसारवेलीवर एक कळीही उमलली होती. तिघांचे सुखी कुटुंब होते. पण त्याच्या मनात नको विचार यायले लागले आणि सर्व एका क्षणात संपले.

आधी पत्नीचे नाक कापले, मुलीचा..., मग स्वतःही जीवन संपवले, कारण काय?
क्षुल्लक कारणातून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 11:26 PM

कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यात अलीकडच्या काळात कौटुंबिक पातळीवरही रक्तरंजित घटना वाढल्या आहेत. कानपूर शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेने उत्तर प्रदेशसह आसपासच्या राज्यांतही प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. संताप अनावर झालेल्या तरुणाने संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याचा कट रचला. सर्वात आधी पत्नीचे हात बांधून ब्लेडने तिचे नाक कापले. मग पोटाच्या मुलीची हत्या केली. यानंतर स्वतः जीवन संपवले. तरुणाच्या या अत्यंत भयानक कृत्याने संपूर्ण कानपूर शहर हादरले आहे. छोटू असे या तरुणाचे नाव असून, तो हनुमंत बिहार ठाणे अंतर्गत नौबस्ता गल्ला मंडी येथील रहिवासी आहे.

पत्नीवर हल्ला करत मुलीसह स्वतःचे जीवन संपवले

छोटूने जीवघेणा हल्ला केल्यानंतर पत्नी रुखसार ही गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यानंतर तिला पतीच्या भयानक कृत्यामुळे मुलीचा बळी गेल्याचे आढळले. तसेच पतीनेही जीवन संपवल्याने रुखसारला मोठा धक्का बसला. पतीच्या रागामुळे दोन बळी गेल्याने परिसरात प्रचंड खळबळ तसेच हळहळही व्यक्त केली जात आहे. पती छोटू हा नेहमीच पत्नी रुखसारच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याच संशयातून छोटू आणि रुखसार या दोघांमध्ये वारंवार वाद होत असायचे.

रागाच्या भरात भलतंच करुन बसला

बुधवारी रात्री देखील याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणामध्ये छोटूने मागे पुढे न पाहता पत्नीसह मुलीला आणि स्वतःला संपवण्याचा भयंकर निर्धार केला. रागाच्या भरात त्याने पत्नीला भयंकर मारहाण केली. त्यात ती खाली कोसळल्यानंतर ब्लेडने वार करून तिचे नाक कापले.

हे सुद्धा वाचा

कामावरुन घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला

छोटू जिल्हा परिषद सदस्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे तो अनेकदा दिवसभर तसेच रात्रीही उशिरापर्यंत घराबाहेर असायचा. आपल्या पश्चात पत्नी परपुरुषाच्या संपर्कात येत असल्याचा संशय त्याला सजावत होता. बुधवारी रात्री तो निवडणुकीच्या कामामुळे जिल्हा परिषद सदस्याची गाडी उशिरापर्यंत चालवत होता. कामाच्या ताणामुळे वैतागलेल्या अवस्थेतच घरी परतला होता. याचदरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि छोटूला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. यातूनच त्याने पत्नी आणि मुलीसह स्वतःला संपवण्याचे भयंकर कृत्य केले.

घटनेचे वृत्त समजताच कानपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी अवस्थेतील रुखसार हिला रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच मृत अवस्थेतील मुलगी आणि छोटू या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.