त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता, सहा वर्षे सुखाचा संसारही केला, पण…

दोघांनी प्रेमविवाह केला होता. सहा वर्षे सुखाने संसार केला. पण अचानक दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला, मग जे घडले त्याने सर्वच हादरले.

त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता, सहा वर्षे सुखाचा संसारही केला, पण...
नागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 5:51 PM

रामपूर : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करुन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. यात पतीचाही मृत्यू झाला आहे. शहाना असे मयत पत्नीचे, तर शाहजेब असे जखमी पतीचे नाव आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच रामपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. तपासाअंतीच पती-पत्नीमध्ये नेमका काय वाद होता हे कळेल.

काही कारणातून दोघांमध्ये वाद झाला

रामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंज परिसरात शाहजेब आणि शहाना हे दोघे आपल्या दोन मुलांसह राहत होते. दोघांचा सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद व्हायचे. माहेरी गेलेल्या शहाना शुक्रवारी शाहजेब घरी परत घेऊन आला. त्यानंतर शनिवारी सकाळी दोघांमध्ये काही कारणावरुन जोरदार वाद झाला.

आरडाओरडा ऐकून शेजारी धावले

हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने आईस ब्रेकरने पत्नीला भोसकले. पत्नीच्या शरीरावर एकामागोमाग एक जखमा केल्या. इतकंच नाही तिचा डोळाही बाहेर काढला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर पतीने स्वतःही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले.

हे सुद्धा वाचा

घटनास्थळाहून पुरावे गोळा करत पुढील तपास सुरु

घरातील दृश्य पाहून शेजाऱ्यांच्या काळजात धस्सं झालं. शाहजेबचा श्वास सुरु होता. शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गंजा पोलीस ठाणे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संसार सिंह आणि सीओ सिटी अनुज चौधरी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळाहून पुरावे गोळा करत पोलीस पुढील तपास करत आहेत.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.