‘वडिलांचा मृत्यू झालाय, घरी ये’ सांगितले, तरीही पत्नी माहेरु सासरी परतली नाही; मग संतापलेल्या पतीने…
पत्नी माहेरी गेली होती. दोन दिवसांनी सासरवाडीतून पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी आली. यानंतर पतीला दुःख अनावर झाले अन् तो बेशुद्ध झाला. मात्र पोलीस तापासात जे समोर आलं त्यानंतर सर्वच हैराण झाले.
गाझियाबाद : वडिलांच्या मृत्यू झाल्यानंतरही पत्नी माहेरुन सासरी परतली नाही म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा याच कारणातून दोघांमध्ये वाद होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. बिजेंद्र असे आरोपी पतीचे नाव असून, तो पेशाने ड्रायव्हर आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पत्नीच्या चारित्र्यावरही संशय होता
बिजेंद्र आणि संध्याचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. बिजेंद्रला संध्या चारित्र्यावर संशय होता. संध्याचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. संध्याच्या काकांचे 19 मार्च रोजी निधन झाले होते. यामुळे 20 मार्च रोजी ती माहेरी आली होती. संध्याचे काका शाहजहापूर येथे राहतात. कुटुंबातील सर्व सदस्य शाहजहापूरला गेले, मात्र संध्या आई-वडिलांच्या घरीच होती.
वडिलांच्या निधनानंतरही पत्नी घरी आली नाही
यानंतर 21 मार्च रोजी बिजेंद्र वजिलांचे निधन झाले. यामुळे बिजेंद्रने संध्याला फोन करुन घरी येण्यास सांगितले. मात्र संध्या घरी आलीच नाही. यामुळे बिजेंद्र संतापला. दुसऱ्या दिवशी 22 मार्च रोजी तो सासरवाडीत गेला. यावेळी संध्या एकटीच घरी होती. त्याने संध्याला घरी न आल्याबद्दल जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर बिजेंद्र संध्याची हत्या करुन तेथून फरार झाला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
दुसऱ्या दिवशी सासरवाडीतले लोक घरी आल्यानंतर त्यांना संध्याचा मृतदेह आढळला. त्यांनी बिजेंद्रला फोन करुन संध्याच्या मृत्यूची बातमी दिली. पत्नीच्या मृत्यूची बातमी कळताच बिजेंद्रने बेशुद्ध होण्याचं नाटक केलं. यानंतर संध्याच्या संशयास्पद मृत्यूबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी संध्याच्या घराच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिजेंद्र घरी येताना दिसला. यानंतर पोलिसांनी बिजेंद्रला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी बिजेंद्रला बेड्या ठोकल्या आहेत.