Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime: मैत्रीणीने बोलणं बंद केल म्हणून “तो’ चिडला! रागाच्या भरात घरात घुसून नको ते करुन बसला, तिच्यासह स्व:चाही जीव धोक्यात घातला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत तरुणी सराई मंद्रज गावात राहणारी आहे. हल्लोखोर तरुण देखील याच गावात राहतो. दोघं एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्रीचे संबध होते. मात्र, या तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तरुणीचा याला विरोध होता. दरम्यान, दोघांमध्ये यावरून भांडण झाले, त्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. याचा राग आल्याने तरुणाने तरुणीवर हल्ला केला. तरुणाने या तरुणीवर चाकूने सपासप वार केले.

Crime: मैत्रीणीने बोलणं बंद केल म्हणून तो' चिडला! रागाच्या भरात घरात घुसून नको ते करुन बसला, तिच्यासह स्व:चाही जीव धोक्यात घातला
मालाडमध्ये दिराकडून वहिनीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 3:18 PM

आझमगड : रागाच्या भरात माणूस काय करुन बसेल हे कुणी सागू शकत नाही. अशीच एक भयानक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आझमगढमध्ये घडली आहे. मैत्रिणीने अचानक बोलणं बंद केल्याने तिचा मित्र चिडला. रागाच्या भरात त्याने या तरुणीवर हल्ला केला. यानंतर त्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात गच्चीवरुन उडी मारली. दोघंही या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. एकतर्फी प्रेमानातून(one-sided love) हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हल्लेखोर तरुण हा एकतर्फी प्रेमात वेडा झाला होता. मात्र, अचानक पिडीत तरुणीने याच्याशी बोलणं बंद केले. यामुळे या विक्षिप्त तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने हल्ला केला.

घरात घुसून केले चाकूने सपासप वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत तरुणी सराई मंद्रज गावात राहणारी आहे. हल्लोखोर तरुण देखील याच गावात राहतो. दोघं एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्रीचे संबध होते. मात्र, या तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तरुणीचा याला विरोध होता. दरम्यान, दोघांमध्ये यावरून भांडण झाले, त्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. याचा राग आल्याने तरुणाने तरुणीवर हल्ला केला. तरुणाने या तरुणीवर चाकूने सपासप वार केले.

हल्ला करुन गच्चीवरुन उडी मारली

दरम्यान, घरातील लोकांनी आरोपी तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने छतावरून उडी मारली. यात विजेच्या तारांना धडकून तो जमिनीवर पडला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तरुणीच्या कुटुंबियांनी हल्लेखोर तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

लग्नाच्या काही तास अगोदर वधूचे अपहरण

बिहारमधील फारबिसगंज जिल्ह्यातील गोदीहरे येथे एकविचित्र घटना घडलीयं. वरात दारात येण्यापूर्वीच वधूचे अपहरण करण्यात आले. पहाटे तीन वाजेपर्यंत वराच्या मंडळींनी वधूची वाट पाहिली. ही घटना 22 जूनची आहे. लग्नाच्या काही तास अगोदरच वधूचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले. वधूची आई पिंकी देवी यांनी सांगितले की, त्यांनी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी केली, लग्नाची वरात येणार होती. खूप आनंदामध्ये सर्वकाही सुरू होते. पण तेवढ्यात गावातील एका तरुणाने आपल्या मुलीला आमिष  दाखवून पळवून नेले. गावातील सौनू कुमारवर मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे. त्याचे वडील दारूचा व्यवसाय करतात. पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून पोलिस कारवाई करत आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.