महिलांसोबत डीजे नाचण्यास रोखले, मग संतापलेल्या तरुणांनी थेट टोकाचे पाऊल गाठले !

कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त डीजे पार्टी ठेवण्यात आली होती. यावेळी सर्व महिला एकत्र नाचत होत्या. इतक्यात दोन तरुण महिलांच्या ग्रुपमध्ये घुसले. मग जे घडलं त्याने कार्यक्रम स्थळी शोककळा पसरली.

महिलांसोबत डीजे नाचण्यास रोखले, मग संतापलेल्या तरुणांनी थेट टोकाचे पाऊल गाठले !
जमिनीच्या वादातून मुलाच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 12:45 PM

बस्ती : दररोज या ना त्या कारणाने उत्तर प्रदेशात मारहाण, हत्येच्या घटना वाढत आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. महिलांसोबत डीजे नाचण्यास रोखले म्हणून दोघांनी एका तरुणाची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडली. चंद्रभान असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संजय आणि मंगल अशी अटक आरोपींची नावे आहेत. बस्ती जिल्ह्यातील सरदहा गावात ही धक्कादायक घटना घडली.

गृह प्रवेशाच्या कार्यक्रमाला गालबोट

पीडित तरुण चंद्रभानच्या काकाचा नवीन घराच्या गृहप्रवेश होता. यासाठी सर्व नातेवाईक मंडळी, गावकरी उपस्थित राहिले होते. कार्यक्रमानिमित्त भोजन समारंभाचे आणि डीजेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व नातेवाईक महिला डीजेवर डान्स करत होत्या. यादरम्यान, गावातील संजय आणि मंगल हे दोघे तरुण तेथे आले. हे दोघेही महिलांमध्ये घुसून डान्स करुन लागले. चंद्रभानने ते पाहिले आणि महिलांसोबत नाचण्यास तो संजय आणि मंगलला रोखू लागला.

मारहाण आणि चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

या कारणातून चंद्रभानचे आरोपींसोबत भांडण झाले. भांडण विकोपाला गेले आणि आरोपींनी चंद्रभानला मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाण करताना संजयने चंद्रभानच्या छातीत चाकू खुपसला. चंद्रभानला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.