लग्नासाठी दबाव टाकत होती लिव्ह इन पार्टनर, त्याने परफेक्ट प्लानिंग केले, पण एक चूक त्याला महागात पडली !

त्या दोघांचे एकमेकांवर जीवपाड प्रेम होते. दोघे एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र त्याच्या आई-वडिलांना हे नाते मान्य नव्हते. दुसरीकडे प्रेयसी लग्नासाठी तगादा लावत होती.

लग्नासाठी दबाव टाकत होती लिव्ह इन पार्टनर, त्याने परफेक्ट प्लानिंग केले, पण एक चूक त्याला महागात पडली !
प्रियकाराच्या बापानेच तरुणीचा काटा काढलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 5:57 PM

लखनऊ : प्रेयसी वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकराने तिची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. लखनऊ पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या झोपेच्या गोळ्यांच्या सहाय्याने तरुणीच्या हत्येची उकल केली आहे. गुरुवारी सायरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सरौना गावात एका तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला होता. या हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अर्शद आणि मोहम्मद आवेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे.

घटनास्थळी सापडलेल्या झोपेच्या गोळ्यांनी उलगडले हत्येचे रहस्य

घटनास्थळी मिळालेल्या झोपेच्या गोळ्यांवरुन पोलिसांनी सर्व मेडिकल स्टोर्सकडे चौकशी केली. यावेळी एका मेडिकल स्टोर्स मालकाने दिलेल्या माहितीवरुन आरोपीचा सुगावा लागला. तसेच पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यावेळी एका सीसीटीव्हीत दोन तरुण एका तरुणीसह ई-रिक्षातून सरौना गावाकडे जाता दिसले. फुटेजमधील व्यक्तीची ओळख एका मेडिकल स्टोअरच्या मालकाने केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला पकडले

सरौना गावातून परतत असताना त्याच तरुणांचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मात्र त्यात तरुणी बेपत्ता होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अर्शदचा शोध घेतला. अर्शदची चौकशी केली असता सदर मृतदेहाची ओळख पटली. सबा खान असे मयत तरुणीचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा

मयत तरुणी आणि आरोपी लिव्ह इन मध्ये राहत होते

सबा आणि अर्शद गुडंबा येथील आदिलनगर येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. अर्शदच्या आई-वडिलांचा त्यांच्या नात्याला विरोध असल्याने अर्शद तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. मात्र सबा अर्शदवर लग्नासाठी दबाव टाकत होती. यातूनच त्याने सबाला मारण्याचा कट रचला आणि सरौना गावात जाताना तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर अर्शदने त्याचा साथीदार मोहम्मद आवेश याच्या मदतीने तिची हत्या करून मृतदेह लायटरने जाळला.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.