पती परदेशात गेला म्हणून दुसऱ्याच्या प्रेमात पडली, दुसऱ्याने थेट…

महिलेचा पती दुबईला नोकरीसाठी गेला आहे. पती परदेशात गेल्यानंतर महिला तिच्या माहेरी राहत होती. तिथेच तिचे सतिशसोबत प्रेमसंबंध जुळले. महिलेला हे रिलेशन तोडायचे नव्हते. मात्र प्रियकराला हे संबंध तोडायचे होते.

पती परदेशात गेला म्हणून दुसऱ्याच्या प्रेमात पडली, दुसऱ्याने थेट...
अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 12:08 PM

उन्नाव : पती परदेशात गेल्यानंतर दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक प्रेमसंबंध जोडणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. महिलेपासून सुटका करुन घेण्यासाठी प्रियकरानेच तिला संपवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. महिलेच्या सासूच्या तक्रारीवरुन उन्नाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेला 8 महिन्यांची मुलगी आहे. सतिश कुमार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. उन्नाव पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. महिलेचा तिच्या रुममध्ये मृतदेह आढळला होता. यानंतर उन्नाव पोलिसांनी हत्येचा कसून तपास करत प्रकरणाचा छडा लावला.

महिलेचा दुबईला नोकरी करतो

महिलेचा पती दुबईला नोकरीसाठी गेला आहे. पती परदेशात गेल्यानंतर महिला तिच्या माहेरी राहत होती. तिथेच तिचे सतिशसोबत प्रेमसंबंध जुळले. महिलेला हे रिलेशन तोडायचे नव्हते. मात्र प्रियकराला हे संबंध तोडायचे होते. यामुळे त्याने महिलेचा काटा काढण्याचे ठरवले. महिला 5 फेब्रुवारी रोजी तिच्या सासरी रहायला आली होती.

रात्री महिलेची हत्या करुन फरार झाला होता

21 फेब्रुवारी रोजी रात्री घरचे सर्व लोक जेवून आपापल्या खोलीत झोपायला गेले. यानंतर महिलेने सतिशला फोन करुन आपल्या रुममध्ये येण्यास सांगितले. महिलेनेन बोलावल्यानंतर सतिश तिच्या रुममध्ये आला. त्यानंतर त्याने महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मग रुममधील जड वस्तूने तिच्या डोक्यात प्रहाक केला. यानंतर साडीने गळा आवळून हत्या करुन पळून गेला.

हे सुद्धा वाचा

मुलीच्या आवाजाने सासूला जाग आल्यानंतर घटना उघडकीस

मध्यरात्री महिलेची 8 महिन्यांची मुलगी रडायला लागली. मुलीचा आवाज ऐकून महिलेच्या सासूला जाग आली. सासूने महिलेला आवाज दिला, मात्र तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. यानंतर सासू रुममजवळ गेली असता रुमला बाहेरुन कडी असल्याचे पाहिले. कडी काढून सासूने आत प्रवेश केला असता समोरील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

आरोपीला पोलिसांकडून अटक

यानंतर उन्नाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु करत महिलेच्या फोनकॉलवरुन तपास करत आरोपीचा शोध लावला. यानंतर आरोपीला अटक केली असता त्याने सर्व घटना पोलिसांसमोर कथन केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.